फ्रान्समध्ये बोट उलटून 8 स्थलांतरितांचा मृत्यू
‘इंग्लिश चॅनल’ ओलांडण्याच्या प्रयत्नात दुर्घटना
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समधून इंग्लिश चॅनल ओलांडण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. उत्तर फ्रान्समधून ‘इंग्लिश चॅनल’ ओलांडण्याच्या अयशस्वी प्रयत्नादरम्यान स्थलांतरितांनी भरलेली एक मोठी बोट रविवारी पहाटे समुद्राच्या लाटांमुळी बुडाली. यावेळी बोट बुडाल्याने त्यातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली. दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे.
इंग्लिश चॅनल ओलांडताना लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा इंग्लिश चॅनल ओलांडून बेकायदेशीरपणे युरोपमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांचा बोट बुडून मृत्यू झाला आहे. असे असूनही अशा घटना कमी झालेल्या नाहीत. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, उत्तर फ्रान्समधून ब्रिटनला जाण्याच्या प्रयत्नात स्थलांतरितांची एक बोट ‘इंग्लिश चॅनल’मध्ये बुडाली होती. यात 13 जणांचा मृत्यू झाला होता.