कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस नाल्यात कोसळून पंजाबमध्ये 8 ठार

06:45 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

24 हून अधिक जखमी : एनडीआरएफकडून बचावकार्य

Advertisement

► वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

पंजाबमधील भटिंडा येथे प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य राबविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून थेट नाल्यात कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. अपघात झालेल्या बसमधून सुमारे 50 जण प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस खासगी वाहतूक कंपनीची असून ती भटिंडा-शार्दुलगड मार्गावर धावत होती.

भटिंडा येथील जीवनसिंग वालाजवळ भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून थेट खाली असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात कोसळली. सुरुवातीला स्थानिक प्रशासन व नागरिकांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाचीही मदत घेण्यात आली. बचावानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून भटिंडाचे एसएसपी अवनीत कोंडल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले होते.

24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक

बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. 24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाच्या आमदार बलविंदर कौर यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकून धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#accident#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article