महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेवटच्या पाच दिवसांत 8 कोटी कर जमा

06:36 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ यांची कामगिरी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

दक्षिण उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी विष्णूतीर्थ हे दि. 31 मे रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी सेवेतील शेवटच्या पाच दिवसांमध्ये काम करून सरकारला 7 कोटी 94 लाख 35 हजार 668 रुपयांचा कर जमा करून दिला आहे.

सरकारला विविध मार्गांनी कर मिळावा यासाठी सरकारच विविध विभागाला उद्दिष्ट देत असते. ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची धडपड सुरू असते. उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ यांनी सरकारला नेहमीच अधिकाधिक कर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सोमवार दि. 27 मे पासून शुक्रवार दि. 31 पर्यंत हा कर जमा केला. एकूण 446 कागदपत्रांची नोंदणी केली. त्यामधून 6 कोटी 69 लाख 37 हजार 591 स्टॅम्पड्यूटी जमा केली. तर 1 कोटी 24 लाख 98 हजार 77 रुपये नोंदणी शुल्क जमा केले आहेत. असा एकूण 7 कोटी 94 लाख 35 हजार 668 रुपये कर जमा केला आहे. याबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article