कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रिटनमध्ये ‘3 पालकांच्या’ मदतीने 8 अपत्यांचा जन्म

07:00 AM Jul 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या तंत्रज्ञानाने दूर झाला आनुवांशिक आजार

Advertisement

ब्रिटनमध्ये तीन पालकयुक्त आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे 8 अपत्यांचा जन्म झाला आहे. ब्रिटनच्या न्यूकॅसल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एका नव्या तीन व्यक्ती इन विट्रो फर्टिलायजेशन तंत्रज्ञान विकसित केले असून ज्याद्वारे 8 अपत्यांना गंभीर आनुवांशिक आजारांपासून वाचविण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान आईच्या खराब माइटोकॉन्ड्रियाला स्वस्थ दानकर्त्याच्या माइटोकॉन्ड्रियाने बदलते.हे तंत्रज्ञान आई आणि वडिलांच्या डीएनएला सुरक्षित ठेवत आईच्या खराब माइटोकॉन्ड्रियाला हटविते, माइटोकॉन्ड्रियाला पेशींच्या ‘ऊर्जा कारखान्या’ला म्हटले जाते. यात खराबी असल्यास हे मेंदू, यकृत, हृदय, स्नायू आणि डिकनी यासारख्या अवयवांना प्रभावित करू शकते. नव्या तंत्रज्ञानातील प्रक्रिया खराब मायटोकॉन्ड्रियल डीएनएला स्वस्थ डीएनएद्वारे बदलत असल्याचे वैज्ञानि मेरी हबर्ट यांनी सांगितले आहे.

Advertisement

हर्बर्ट या न्यूकॅसल विद्यापीठात प्रजनन जीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. या तंत्रज्ञानाचे परीक्षण 22 महिलांवर करण्यात आले. या महिलांच्या अपत्यांना आनुवांशिक आजार होण्याचा धोका होता, यातील 8 महिलांनी तंदुरुस्त मुलांना जन्म दिला. यात 4 मुलगे आणि 4 मुली आहेत. तर एक महिला सध्या गरोदर आहे. 6 मुलांमध्ये आईचा खराब मायटोकॉन्ड्रियल डीएनए 95-100 टक्क्यांनी कमी आढळला. तर दोन जणांमध्ये 77-88 टक्क्यांनी कमी आढळला. सर्व मुले जन्मावेळी तंदुरुस्त होती. त्यांचा विकास सामान्य आहे. तर एका मुलाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये किंचित बदल होता, जो उपचारानंतर नीट करण्यात आला.

कुणाला होणार लाभ

मायटोकॉन्ड्रियल आजार दर 5000 जन्मापैकी एकाला प्रभावित करतो. हा आजार आईकडून मुलाला वारशादाखल मिळतो. यावर उपचार शक्यत नाही. यामुळे स्नायूंमध्ये कमजोरी, दृष्टीदोष, मधुमेह आणि अवयवय निकामी होणे यासारख्या समस्या होऊ शकतात. 2015 मध्ये ब्रिटन हा मायटोकॉन्ड्रियल दान उपचाराला मानवावर संशोधनासाठी वैध ठरविणारा पहिला देश ठरला होता. तर अमेरिकेने यावर बंदी घातली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article