For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7th International Yoga Day : कोरोना संकटात योग आशेचा किरण : नरेंद्र मोदी

08:24 AM Jun 21, 2021 IST | Tousif Mujawar
7th international yoga day   कोरोना संकटात योग आशेचा किरण   नरेंद्र मोदी
Advertisement

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

Advertisement

आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी  देशभरातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. कोरोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे, असे नरेंद्र मोदीं यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधने, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हात. जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. परंतु आपण सगळ्यांनी पाहिले की, अशा कठीण प्रसंगी लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढले आहे. योगा आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे माध्यम बनले आहे.

Advertisement

  • M-Yoga ॲपने जगाला मिळणार शक्ती 

योग दिनाच्या निमित्ताने आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी योगासनाचे महत्त्व संपूर्ण जगभरात समजावे ही एकमेव भावना होती. आज या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जगाला M-Yoga ॲपची शक्ती मिळणार आहे. या ॲपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील

Advertisement
Tags :

.