महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुनक यांच्या पक्षाच्या 78 खासदारांचा राजकारणाला रामराम

06:58 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 122 नेत्यांचा निवडणूक लढविण्यास नकार

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सत्तारुढ कॉन्झर्वेटिव्ह पार्टीत सातत्याने खासदारांकडून राजीनामा देण्यात येत आहे. अलिकडेच टोरी पार्टीचे वरिष्ठ नेते मायकल गोव आणि आंड्रे लिडसमन यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. याचबरोबर सुनक यांच्या पक्षात राजकारणातून संन्यास घेणाऱ्या एकूण खासदारांची संख्या 78 झाली आहे.

मायकल गोव यांच्यापूर्वी संरक्षणमंत्री बेन वालेस, माजी पंतप्रधान थेरेसा मे, साजिद जाविद, डोमिनिक रॉब, मॅट हॅनकॉक, नदीम जहावी यासारख्या दिग्गजांनी सार्वत्रिक निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर इतक्या अधिक संख्येत खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण 650 खासदार आहेत. आतापर्यंत एकूण 122 खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

एलन व्हाइटहेड आणि हॅरिट हर्मन समवेत विरोधी पक्ष लेबर पार्टीच्या एकूण 22 खासदारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत हा आकडा 74 राहिला होता. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केवळ 31 तर 2015 च्या निवडणुकीपूर्वी 90 खासदारांनी पुन्हा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.

राजीनामा का देत आहेत?

ब्रिटिश खासदारांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण कॉन्झर्वेटिव्ह पार्टीची खराब स्थिती आहे. आगामी निवडणूक लढविली तर पराभूत व्हावे लागेल अशी खात्री अनेक टोरी खासदारांना आहे. अशा स्थितीत ते पुन्हा निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये नाहीत. याचबरोबर एक महत्त्वाचे कारण अनेक खासदारांचे वय आहे. अनेक खासदारांनी वयामुळे पुन्हा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेले काही खासदारही पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. डिहेना अँडरसन (30 वर्षे), निकोल रिचर्ड्स (29 वर्षे), माइरी ब्लॅक (29 वर्षे) यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासदारांनी अन्य पेशामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी राजकारण सोडले आहे. तर काही खासदारांनी तणावपूर्ण राजकारणापासून दूर राहण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज मिळणाऱ्या हिंसक धमक्यांमुळे राजकारण सोडले आहे. संसद सदस्यत्व एक चांगला जॉब आहे, परंतु यात अत्यंत अधिक तणावाला सामोरे जावे लागते, असे कॉन्झर्वेटिव्ह खासदार अँडरसन यांनी म्हटले आहे.

2010 मध्ये 149 खासदारांचा राजीनामा

यापूर्वी 2010 मध्ये सर्वाधिक 149 खासदारांनी राजीनामा दिला होता. इतक्या मोठ्या संख्येत ब्रिटिश खासदारांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण संसद खर्च घोटाळा होता. अनेक खासदारांनी स्वत:चे भत्ते आणि खर्चांचे बनावट दावे केले असल्याचा खुलासा झाला होता. या घोटाळ्यामुळे ब्रिटिश राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आणि अनेक खासदार जनतेत अलोकप्रिय ठरले होते. याचमुळे अनेक खासदारांनी राजकीय दबावापोटी राजीनामा दिला होता.

1997 मध्ये 75 लेबर खासदारांचा राजीनामा

यापूर्वी 1997 मध्ये 117 खासदारांनी स्वत:चे पद सोडले होते. यात लेबर पार्टीच्या 75 खासदारांचा समावेश होता. स्कॉटिश संसदेच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. हे पाऊल तत्कालीन टोनी ब्लेअर यांच्या लेबर पार्टी सरकारकडून संमत विकेंद्रीकरण कायद्याच्या अंतर्गत उचलण्यात आले होते. याचा उद्देश स्कॉटलंडमध्ये लेबर पार्टीच्या राजकीय उपस्थितीला मजबूत करणे होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article