महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशात दर मिनिटाला 761 सायबर हल्ले

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2023 मध्ये सुमारे 85 लाख उपकरणांवर 40 कोटीहून अधिक घटनांची नोंद

Advertisement

निरीक्षण...

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारतात 2023 मध्ये सुमारे 85 लाख उपकरणांवर 40 कोटींहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. अर्थातच दर मिनिटाला 761 सायबर हल्ले झाले. यापैकी सर्वाधिक प्रकरणे सुरत (15 टक्के) आणि बेंगळूर (14 टक्के) येथे आढळून आली आहेत. यापैकी 50 टक्क्मयांहून अधिक मीडिया आणि नेटवर्क ड्राईव्हशी संबंधित आहेत. भारतात गेल्या सहा महिन्यांत दर आठवड्याला सायबर हल्ल्यांमुळे तीन क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. यामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, संशोधन आणि उपयुक्तता यांचा समावेश होतो. चेक पॉइंटच्या थ्रेट इंटेलिजन्स अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यात भारतात दर आठवड्याला प्रतिक्षेत्र सरासरी 2,157 सायबर हल्ले झाले, तर जागतिक स्तरावर हे प्रमाण 1,139 हल्ले इतके झाले. रिटेल, हॉस्पिटॅलिटी, मॅन्युपॅक्चरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन या क्षेत्रांनाही सायबर सुरक्षेबाबत त्वरीत वाटचाल करावी लागेल, असे तज्ञांनी सांगितले. डेटा सिक्मयुरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) अहवालानुसार, सुमारे 25 टक्के हल्ले एसएमएस, ई-मेल आणि वेबसाईट्समधील हानिकारक लिंक्सवर क्लिक केल्यामुळे होतात. अँड्रॉईड उपकरणांद्वारे दर महिन्याला सरासरी तीन हल्ले देखील नोंद होत आहेत. लाखो युजर्सनी बनावट अॅप डाऊनलोड केल्यामुळे उपकरणे हॅक होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आली आहेत. अशा हल्ल्यांच्या माध्यमातून फोन नंबर, पत्ते, आधार क्रमांक आणि पासपोर्टची माहिती चोरण्याचा हॅकर्सचा इरादा असतो.

केंद्र सरकारकडूनही संसदेत माहिती

केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या 140 कोटी भारतीयांच्या वैयक्तिक माहितीवर (डेटा) डल्ला मारण्याचे प्रकार हॅकर्सकडून सुरूच आहेत. भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाने स्वत: संसदेत यासंबंधी कबुली दिली असून गेल्या 70 महिन्यांत डेटा हल्ल्याच्या 165 घटना समोर आल्या आहेत. अँड्रॉइड फोनवर दर तासाला सर्वाधिक 45 हजार मालवेअर अटॅक नोंदवले गेल्याचेही सांगण्यात आले. मंत्रालयाच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या घटनांची नोंद केली आहे. सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून काहीवेळा हॅकिंगचे प्रयत्न करण्यात आले, परंतु डेटा लीक होऊ शकला नाही. तथापि, खासगी डेटावरील हॅकिंगचे प्रकार एखाद्या महामारीसारखे वाढत असल्याचा दावा आयटी मंत्रालयाने केला आहे.

इस्रोवरही वारंवार सायबर हल्ला

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी अलीकडेच देशाच्या अंतराळ संस्थेवर दररोज 100 हून अधिक सायबर हल्ले होत असल्याचा दावा एका कार्यक्रमात केला होता. रॉकेट तंत्रज्ञानात सायबर हल्ल्याची शक्मयता खूप जास्त आहे. सायबर आरोपी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिप्स वापरतात. मात्र, इस्रो अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही मजबूत सायबर सुरक्षा नेटवर्कने सुसज्ज आहोत. रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षिततेवर इस्रो लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article