महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करबुडव्या 7500 मिळकतधारकांना दणका

12:33 PM Nov 29, 2024 IST | Pooja Marathe
7500 tax evaders hit hard
Advertisement

2019 पासून फरकासह घरफाळा लागू होणार

Advertisement

दोन वेळा नोटीस देऊनही कागदपत्र जमा केली नसल्याने कारवाई

Advertisement

20 हजार 219 मिळकतींचा सर्व्हे

77 लाखाने उत्पन्नात वाढ

निवडणूक ड्यूटीनंतर पुन्हा सर्व्हेचे काम सुरू

कोल्हापूर: विनोद सावंत

महापालिकेच्या घरफाळा रिव्हीजनमध्ये करबुडाव्या मिळकतींचा पर्दापाश होत आहे. यामधील 7500 करबुडव्या मिळकतींना कागदपत्र देण्याबाबत दोन वेळा नोटीस बजावूनही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या मिळकतधारकांविरोधात अक्रमक भूमिका घेतली असून सर्व्हेनुसार आढळून आलेल्या वाढीव घरफाळा 2019 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू केली आहे.

घरफाळा विभागाकडून 20 वर्षापासून मिळकतीची रिव्हीजन (फेर तपासणी) झालेले नाही. यामुळे बहुतांशी नवीन बांधकाम झालेल्या मिळकती, वाढीव बांधकाम, वापरात बदल केलेल्या मिळकतींना घरफाळाच लागू झालेला नाही. यामुळे मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळेच मनपाने स्वत:कडील कर्मचाऱ्यांमार्फतच रिव्हीजन सुरू केले आहे. निवडणूक कामामुळे सर्व्हेच्या कामाला ब्रेक लागला होता. आता पुन्हा सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. वर्षभरात या पथकाने 20 हजार 219 मिळकतींची तपासणी केली असून यामुळे 78 लाखांचे उत्पन्न वाढले आहे.

करबुडव्या 7500 मिळकतींना महापालिकेन घरफाळा लागू केव्हापासून करावा यासंदर्भातील बांधकाम परवानगी अथवा अन्य कागदपत्र देण्याची नोटीस बजावली होती. परंतू त्यांच्याकडून कोणतचा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पुन्हा नोटीस बजावली. त्यासही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे थेट त्यांच्या मिळकतीवर सर्व्हेनुसार 1 एप्रिल 2019 पासून वाढीव घरफाळा लावला जाणार आहे.

नोटीस नाही आता थेट कारवाई
7500 मिळकतधारकांना आता पुन्हा नोटीस नाही. थेट कार्यवाही होणार आहे. नवीन घरफाळा लागू झाला असल्याची 15-2 ची नोटीस देणार आहे. ज्यांची हरकत असेल त्याची सुनावणी होणार आहे. हरकत नसणाऱ्यांना थेट मनपाने केलेल्या आकरणीनुसार घरफाळा पावती दिली जाणार आहे.

पथकातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
सर्व्हेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत सर्व्हे करणे आणि दिड ते दोन जेवणची सुट्टीनंतर दुपारी 2 ते सायंकाळी 6.30 त्यांचे नियमित काम करायचे आहे. परंतू काहीजण सर्व्हेच्या नावाखाली बाहेर पडतात परंतु सर्व्हेही करत नाहीत. असे कामचुकार कर्मचारी आता रडारवर असणार आहेत. पथकातील सर्व कर्मचाऱ्यांना रोज सकाळी कामावर हजर रहावे लागणार आहे. त्यांनी सव्वा दहापर्यंत हजेरी पत्रकाची झेरॅक्स वरीष्ठान द्यावी लागणार आहे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी पंचिंग बंधनकारक असेल. यापूर्वीच्या कामाचाही लेखाजोखा घेतला जाणार असून सर्व्हेत टाळाटाळ केल्याचे उघडकीस आल्यास संबंधितास दंडात्मक कारवाई होणार आहे. आता रोज किमान 7 ते 10 मिळकतींच सर्व्हे बंधनकारक असणार आहे.

एकूण मिळकती -                             1 लाख 61 हजार 570
सर्व्हेला सुरवात-                                21 ऑक्टोंबर 2023
सर्व्हेसाठी एकूण पथक-                      87
सर्व्हेसाठी कर्मचारी-                           174
एकूण मिळकतींची तपासणी -             20 हजार 219
वाढीव बांधकामांना घरफाळा लागू -     40 लाख
नवीन मिळकतांना घरफाळा लागू -      38 लाख
वर्षाला घरफाळ्यात झालेली वाढ -       78 लाख

शहरातील 7500 मिळकतधारकांनी दोन वेळा नोटीस देऊनही कागदपत्र दिलेली नाहीत. त्यामुळे प्रशासकांच्या आदेशानुसार त्यांना अंतिम 15-2 ची वाढीव बांधकामानुसार कर आकारणीची नोटीस बजावली जाणार आहे. यातूनही कोणी हरकत घेतली नाही तर थेट त्यांच्या मिळकतींवर वाढीव आकारणीनुसार घरफाळा लागू करून बील पाठविले जाणार आहे.
सुधाकर चल्लावाड, कर निर्धारक, संग्राहक महापालिका

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article