6कंपन्यांच्या बाजारमूल्यात 70 हजार कोटीची घसरण
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआयचे मूल्य सर्वाधिक घटले : रिलायन्सचे मूल्य वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 70,325 कोटी रुपयांनी कमी झाले होते. यामध्ये एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
दहा कंपन्यांमध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात वाढले होते तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचे बाजार भांडवल मूल्य कमी झाले असल्याचे पहायला मिळाले.
यांचे मूल्य घसरले
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 19,284 कोटी रुपयांनी घसरत 15,25,339 कोटी रुपयांवर पोहोचले होते तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 13,566 कोटी रुपयांनी कमी होत 10 लाख 29 हजार 470 कोटी रुपयांवर घसरले होते. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 13,236 कोटी रुपयांनी कमी होत 5,74,977 कोटी रुपयांवर आणि एलआयसीचे बाजारमूल्य 10,246 कोटी रुपयांनी कमी होत 5,95,277 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 8032 कोटी रुपयांनी कमी होत 12,37,729 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. दूर संचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 5,958 कोटी रुपयांनी कमी झाले.
यांच्या मूल्यात वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवल मूल्य मात्र 15359 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 66 हजार 949 कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे मूल्य 13127 कोटी रुपयांनी वाढत 6लाख 81 हजारवर पोहचले.