For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये 7 आयईडी बॉम्ब निकामी

06:23 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये 7 आयईडी बॉम्ब निकामी
Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी शनिवारी इंफाळमध्ये 7 इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हायसेस (आयईडी) बॉम्ब निकामी केले. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कराने बॉम्बशोधक पथकाच्या सहाय्याने विशेष मोहीम हाती घेतली. यावेळी रस्तामार्ग आणि शिवारातून बॉम्बनिकामी पथकाने साईचांग इथम परिसरातून 33 किलो वजनाचे सर्व आयईडी निकामी केले. मणिपूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मे 2023 पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात 220 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच सुमारे 50 हजार लोक अंतर्गत विस्थापित झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.