महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लर्निंग लायसन ऑनलाइन परीक्षेत 699 जण फेल

05:58 PM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लर्निंग लायसन्ससाठी (शिकाऊ परवाना) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा अनेकांना डोकेदुखी ठरत आहे. या परीक्षेत सुमारे 10 टक्के वाहनधारक फेल होत आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा ही परीक्षा देण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. लर्निंग लायसन्ससाठी जानेवारी ते 30 जून 2024 या सहा महिन्यांत 13 हजार 435 वाहनधारकांनी ऑनलाईन परीक्षा दिली. यामध्ये तब्बल 699 जण फेल झाले आहेत. यामध्ये पास झाल्याशिवाय परवाना मिळवण्यासाठी पात्र होता येत नाही.

Advertisement

प्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना घेतल्यानंतरच दुचाकी, चारचाकी किंवा अवजड वाहन चालविण्यास परवानगी दिली जाते. वाहन चालविणारा वाहन चालविण्यास योग्य आहे. त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे. हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते. परवाना नसताना वाहन चालविताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शहर वाहतूक नियंत्रण शाखा अथवा प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई होते. त्यामुळे नव्याने वाहन चालवण्यासाठी शिकलेले वाहन परवाना घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात येतात. यासाठी मोठी रांग लागलेली नेहमी दिसून येते. लर्निंग लायसन्स घेण्यासाठी वाहनधारकाला आरटीओ ऑफीसअंतर्गत घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. यासाठी रोज 120 वाहनधारकांचा कोटा निश्चित केला आहे. लर्निंगसाठी अर्ज केलेल्या 120 जणांना परीक्षेसाठी अपॉईटमेंट दिली जाते. ऑनलाईन स्वरुपाची ही परीक्षा असते. यामध्ये 15 प्रश्न विचारले जातात. उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. यामध्ये योग्य पर्याय निवडावा लागतो. 15 पैकी 9 प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यानंतरच संबंधित पास होतो. यानंतरच त्यांना लर्निंग लायसन्स दिले जाते. तर नापास होणाऱ्यांना पुन्हा 50 रुपये फी भरून नवीन अपॉईटमेंट घ्यावी लागते. कोल्हापूर आरटीओ विभागाच्या परीक्षेत एकावेळी 8 वाहनधारक परीक्षा देऊ शकतात. सर्व उत्तरे सोडविण्यासाठी किमान 10 ते 15 मिनटे लागतात. यामध्ये वाहन चालविण्यासाठीचे नियम, चिन्हांवर आधारीत प्रश्न विचारले जातात.

सहा महिन्यांत 12 हजार 736 वाहनधारक पास

प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी 2024 ते 30 जून 2024 मध्ये लर्निंग लायसन्ससाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत 699 वाहनधारक फेल झाले आहेत. तर 12 हजार 736 वाहनधारकांनी 15 पैकी 9 हून अधिक प्रश्नांची उत्तरे बरोबर देत उत्तीर्ण झालेत.

परीक्षेसाठी रोज 70 ते 80 वाहनधारकच हजर

आरटीओने लर्निग लायसन्ससाठी अर्ज केलेल्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी 120 जणांचा कोटा निश्चित केला असला तरी केवळ 70 ते 80 वाहनधारकच परीक्षेsसाठी येतात. यामध्येही सुमारे 10 वाहनधारक नापास होतात. त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते.

सहा महिन्यांत पक्के लायसन घेणे बंधनकारकर

लर्निंग लायसन्सची मुदत सहा महिन्यांसाठी असते. सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी पक्के लायसन्स काढून घ्यावे लागते. पक्के लायसन्ससाठी रोज 250 वाहनधारकांनाच प्रात्यक्षिक देण्यासाठी बोलवले जाते. नियमानुसार परीक्षकांसमोर वाहन चालवल्यानंतर तसेच नियमांची माहिती सांगितल्यानंतरच पक्के लायसन्स दिले जाते.

...तर परीक्षेपूर्वीच आरोग्य तपासणी

लर्निंग लायसन्साठी ऑनलाईन परीक्षा देण्यापूर्वीच वाहनधारकास जाड काचेचा चष्मा असल्यास अथवा काही आरोग्यामध्ये बिघाड दिसून येत असल्यास त्याच्या आरोग्याची आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानंतरच लायसन्स दिले जाते.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article