For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताळगांव ग्रामपंचायतीसाठी 68.79 टक्के मतदान

12:04 PM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ताळगांव ग्रामपंचायतीसाठी 68 79 टक्के मतदान
Advertisement

सात प्रभागांची मतमोजणी आज : चार प्रभागांत यापूर्वीच बिनविरोध निवड

Advertisement

पणजी : तिसवाडी तालुक्यातील ताळगांव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 68.79 टक्के मतदान झाले असून आज सोमवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बालभवन-कापांल येथे मतमोजणी होणार आहे. ताळगांव पंचायतीवर वर्चस्व गाजवणारे  महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी आपल्याच गटाचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. मोन्सेरात यांनी सकाळी 8.45 च्या सुमारास वॉर्ड नं-8 मध्ये मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत 7 वॉर्डमध्ये सरळ दुहेरी लढत झाली असून आज सोमवारी सकाळी 8 वाजल्यानंतर निकाल जाहीर होणार आहेत. मतपत्रिकेद्वारे हे मतदान घेण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच एकूण 4 वॉर्डातून मोन्सेरात गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 11 वॉर्डांसाठी ही निवडणूक होती, परंतू 7 वॉर्डांसाठीच मतदान घेण्यात आले.

 • वॉर्ड नं-1 मध्ये उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने तेथे मतदान घेण्यात आले नाही.
 • वॉर्ड नं-2 मध्ये 70.98 टक्के मतदान झाले. त्या वॉर्डात 2233 मतदार होते, त्यापैकी 1585 जणांनी मतदान केले. त्यात 759 पुऊष तर 826 महिला मतदारांचा समावेश होता.
 • वॉर्ड नं-3 मध्ये 942 पुऊष तर 1079 महिला मतदार असून त्यापैकी अनुक्रमे 534 व 615 जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 56.85 टक्के झाली. एकूण मतदार 2021 होते त्यातील 1149 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
 • वॉर्ड नं-4 मध्ये 1329 मतदार होते. त्यात 646 पुऊष तर 683 महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी 926 जणांनी मतदान केले त्यात 462 पुऊष आणि 464 महिला मतदारांनी सहभाग दर्शवला.
 • वॉर्ड नं-5 मध्ये 1073 मतदार होते. त्यात पुऊष मतदार 499 तर महिला मतदार 574 एवढे होते. त्यापैकी अनुक्रमे 382 व 435 जणांनी म्हणजे 817 मतदारांनी मतदान केले. ते 76.14 टक्के झाले.
 • वॉर्ड नं-6 मधून उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने तेथे मतदान घेण्यात आले नाही.
 • वॉर्ड-नं 7 मध्ये 1935 मतदार होते. त्यात 944 पुऊष तर 991 महिला मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 759 पुऊष तर 792 महिला मतदारांनी मतदान केले. एकूण 1551 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि टक्केवारी 80.16 इतकी झाली.
 • वॉर्ड नं-8 मधून 888 पुऊष तर 1017 महिला अशा 1905 मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 545 आणि 638 अशा 1183 जणांनी मतदान केले. हे मतदान 62.10 टक्के आहे.
 • वॉर्ड नं-9 मध्ये 1492 मतदार आहेत. त्यात 707 पुऊष तर 785 महिला मतदार असून त्यापैकी 493 व 542 जणांनी मतदानात भाग घेतला. 1035 जणांनी मतदान केले असून टक्केवारी 69.37 एवढी झाली आहे.
 • वॉर्ड नं-10 व 11 मध्ये यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने तेथे मतदान झाले नाही.

ताळगांव पंचायत निवडणुकीसाठी एकूण 17 ठिकाणी मतदान केंद्रे होती तर एकूण मतदारांची संख्या 11988 होती. त्यात 5690 पुऊष तर 6298 महिला मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी 3934 पुऊषांनी तर 4312 महिलांनी मिळून एकूण 8246 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता पुन्हा त्याच मतदारांना 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होणार असून मतपत्रिकांमुळे दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील असा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.