मणिपूरमध्ये 67 एकरमधील अफूची लागवड नष्ट
वृत्तसंस्था/ इंफाळ
सुरक्षा दलांनी मणिपूरच्या कांगपोक्पी जिह्यातील डोंगरांमध्ये 67 एकर क्षेत्रात बेकायदेशीर करण्यात आलेली अफूची लागवड नष्ट केली. सुरक्षा दल, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीबी) आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारपासून सुरू केलेली कारवाई तीन दिवसांनी पूर्ण झाल्याचे सोमवारी पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कांगपोक्पी जिह्यातील माकुई अशांग, लालोई, वाकोटफाई, चालजुंग आणि आसपासच्या भागात 67 एकर क्षेत्रावरील बेकायदेशीर अफूची लागवड नष्ट करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि राज्य सरकारचे राज्यातील विविध डोंगरांमध्ये अफूची लागवड नष्ट करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. हा उपक्रम पंतप्रधानांच्या ‘ड्रग्जमुक्त भारता’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.