महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यातील 668 जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य

11:33 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पंचायतीच्या प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीतून धक्कादायक माहिती उजेडात

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील 668 हून अधिक जलस्रोतांतून पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे. नुकतेच जिल्हा पंचायतीच्या प्रयोगशाळेत झालेल्या तपासणी दरम्यान ही धक्कादायक माहिती उजेडात आली असून जिल्हा प्रशासनाने या गावांना पर्यायी व्यवस्था केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कूपनलिका, विहीर व ओव्हरहेड टँकच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याचे प्रकल्प आहेत. यापैकी 668 हून अधिक जलस्रोतांतून अशुद्ध पाणी येते. त्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.

Advertisement

पिण्याचे पाणी विभाग व जिल्हा पंचायतीच्यावतीने लॅबमध्ये पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. दरवर्षी ग्राम पंचायत पातळीवर पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी होते. पिण्यायोग्य आहे की नाही, हे पडताळून पाहण्यात येते. जिल्हा पंचायतीच्या लॅबमध्ये केलेल्या तपासणीत 500 हून अधिक ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रातून 15 हजार पाण्याचे नमुने तपासणीसाठी उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यापैकी 8 हजार 56 पाण्याचे नमुने मिळवून त्याची शुद्धता तपासण्यात आली. 668 नमुने पिण्यायोग्य नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या अशुद्ध पाण्याच्या सेवनामुळे उलटी, जुलाब, कॉलरासारखी रोगराई फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था केली आहे.

जलस्रोत परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे

विहीर, कूपनलिकांमधून जिथे पाणीपुरवठा केला जातो, तो परिसर स्वच्छ ठेवला जात नाही. पाईपलाईनही व्यवस्थित नसते. गटारीचे पाणी जलस्रोतात झिरपत असते. कूपनलिकेतील मातीची गुणवत्ताही घसरते. वातावरणातील बदलामुळेही काहीवेळा पाणी पिण्यासाठी अयोग्य ठरते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत येथील परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. उपलब्ध माहितीनुसार बेळगावात 56, चिकोडी तालुक्यात 133, अथणी तालुक्यात 220, सौंदत्ती तालुक्यात 187 जलस्रोत गढूळ ठरले आहेत. गोकाक येथील लॅबमध्ये तपासलेले चौदा पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.

ग्राम पंचायतीच्या पातळीवरही एफटीके किटच्या माध्यमातून 28 हजार 316 पाण्याच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले असून यापैकी 25 हजार 971 नमुने पिण्यायोग्य तर 2 हजार 345 पाण्याचे नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळले आहे. पाणी तपासण्याच्या अभियानाचा एक भाग म्हणून शाळेत पुरविणाऱ्या पाण्याचे नमुनेही तपासले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य आढळले नाही तर त्वरित संबंधित शाळांना त्या पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना दिली जाते. जिल्ह्यातील 668 जलस्रोतांतून येणाऱ्या पाण्याचा कोणत्याही परिस्थितीत पिण्यासाठी वापर करू नये, अशी सूचना केली असून पिण्यायोग्य असलेल्या 610 पर्यायी जलस्रोतांतून पाणीपुरवठा करण्याची सूचना केली आहे. काही दिवसांनंतर पुन्हा तपासणी करून येणाऱ्या अहवालावरून त्या पाण्याचा वापर करावा की नाही, हे ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article