For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौंदत्ती यात्रेतून परिवहनला 66 लाखाचा महसूल

11:01 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौंदत्ती यात्रेतून परिवहनला 66 लाखाचा महसूल
Advertisement

बेळगाव : नवरात्रोत्सव काळात बेळगाव-सौंदत्ती (यल्लम्मा) मार्गावर धावलेल्या बससेवेतून परिवहनला 66 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला यल्लम्मा देवी पावली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सौंदत्ती-यल्लम्मा आणि वाडीरत्नागिरी जोतिबाला जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून हे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी नवरात्रोत्सव काळात दररोज अतिरिक्त 70, कोल्हापूर येथील वाडीरत्नागिरी जोतिबासाठी अतिरिक्त 20 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून परिवहनला समाधानकारक उत्पन्न प्राप्त झाले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 2 ते 12 ऑक्टोबरदरम्यान सौंदत्ती आणि जोतिबा मार्गावर या विशेष बस धावल्या. या काळात प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जोतिबासाठी 200 रुपये फुल तिकीट तर लहानांसाठी 100 रुपये तसेच यल्लम्मासाठी फुल तिकीट 120 रुपये तर लहानांसाठी 60 रुपये आकारले होते. सौंदत्ती यल्लम्मा मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना शक्ती योजनेतर्गंत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे सौंदत्ती यल्लम्मा यात्रा विशेष बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Advertisement

नवरात्रोत्सवात अतिरिक्त बससेवेतून 12 लाखांचे उत्पन्न

नवरात्रोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सोडण्यात आलेल्या अतिरिक्त बससेवेतून परिवहनला 12 लाखांचे उत्पन्न मिळाले. पुणे, बेंगळूर, मुंबई, मंगळूर, कोल्हापूर आदी मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. या अतिरिक्त बससेवेतून 12 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Advertisement

प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा आणि जोतिबाला सोडलेल्या यात्रा विशेष बससेवेतून परिवहनला 66 लाखांचा महसूल मिळाला आहे. त्याबरोबरच मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गांवरही सोडलेल्या अतिरिक्त बसमधून 12 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे वाढला होता.

-के. के. लमाणी (डीटीओ, बेळगाव)

Advertisement
Tags :

.