जमिनीत 643 खोलवर मोठा महासागर
पृष्ठभागापेक्षा 3 पट अधिक पाण्याचे अस्तित्व
हे ब्रह्मांड रहस्यांनी व्यापलेले आहे. अंतराळात अनेकप्रकारच्या धातूंचा शोध लागत असतो. त्याच प्रकारे पृथ्वीवर देखील कुठला न कुठला नवा शोध लागत असतो. पृथ्वीच्या आत आणखी नवी गोष्ट मिळाली आहे. वैज्ञानिकांनी अलिकडेच पृथ्वीच्या भूगर्भात पाण्याचा साठा शोधला आहे.
वैज्ञानिकांनी पृथ्वीखाली पाण्याचा महासागर शोधला आहे. हा महासागर जमिनीत 643 खोलवर असून तो खडकांमध्ये गोठलेला आहे. ज्या खडकात हे पाणी शोधण्यात आले आहे, त्याचे नाव रिंगवुडाइट असून हा एक मेंटल रॉक असून ज्याच्या आत एक परंपरागत स्पंज सारख्या अवस्थेत पाणी जमा असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
रिंगवुडाइटमध्ये पाणी ठोस तसेच तरल तसेच कुठल्यी वायूच्या स्वरुपात नाही. तर हा काही अनोखा चौथा प्रकार आहे. रिंगवुडाइट खडक एक स्पंजप्रमाणे असून तो पाणी शोषून घेतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. याचा खुलासा याच्या संशोधनात सामील भूभौतिकीतज्ञ स्टीव जॅकबसन यांनी केला आहे.
हा खडक काही खास असून तो हायड्रोजनला आकर्षित करतो आणि पायण्ला स्वत:मध्ये शोषून घेतो. या खनिजात अत्यंत अधिक पाणी असू असते. आमचे वैज्ञानिक दशकांपासून बेपत्ता झालेल्या खोल पाण्याचा शोध घेत होते. हा नवा शोध आमच्या संशोधनाला अधिक व्यापक स्वरुप देणारा असल्याचे स्टीव यांनी म्हटले आहे.
खोल जमिनीतील महासागराचा शोध हा वैज्ञानिक भूकंपाचे अध्ययन करत असताना लागला आहे. भूकंपमापक पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली शॉकवेव्स टिप होते. यानंतर रिंगवुडाइटमध्ये पाण्याचा साठा असल्याचे समजले. खडकात केवळ एक टक्के पाणी असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली महासागरांच्या तुलनेत तीनपट अधिक पाणी असल्याचे यातून समजते.