महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांकवाळात 64 बेकायदेशीर घरे जमिनदोस्त

06:45 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांकवाळ कोमुनिदादची दोन दिवस धडक कारवाई, कोर्टाच्या आदेशामुळे दोन वर्षांनंतर जमीन मुक्त

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

Advertisement

सांकवाळ कोमुनिदादीच्या बिर्ला झुआरीनगर भागातील जमिनीवर उभारण्यात आलेली सर्व बेकायदा घरे काल गुरूवारी संध्याकाळपर्यंत दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासनाने जमिनदोस्त करून धडक कारवाई पूर्ण केली. सर्वच्या सर्व 64 बेकायदा घरे पाडण्यात आली. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन वर्षांनंतर ही जमीन अतिक्रमणांपासून मुक्त झाली आहे.

सांकवाळ कोमुनिदादच्या झुआरीनगरातील एकूण 22 हजार 30 चौ. मि. जमिनीवर अवघ्या सहा महिन्यांत एकूण 64 घरांचे अतिक्रमण झाले होते. यात काही घरे स्लॅबची होती. काही घरे पक्की परंतु सिमेंट पत्र्यांच्या छताची होती. काही घरे पूर्णपणे पत्र्यांची होती. दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासनाने उच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर या घरांविरूध्ध्द कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर बुधवारी या कारवाईला कडक पोलीस बंदोबस्तात सुरवात करण्यात आली होती. संबंधीत अधिकारी व सांकवाळ कोमुनिदादचे पदाधिकारी या कारवाई वेळी हजर होते. दोन दिवसांच्या धडक कारवाईत सर्व 64 घरे जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी एकूण पाच जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. गेली दोन वर्षे आपल्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत खस्ता खाल्लेल्या सांकवाळ कोमुनिदादने कारवाई यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

फसलेल्या कुटुंबांचे संसार उघड्यावर

कोमुनिदादची जमीन मुक्त करण्याची कारवाई यशस्वी झाल्याने अतिक्रमणविरोधी लोकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ही घरे काहींनी पैशांच्या व राजकीय वरदहस्ताच्या बळावर उभारली होती. काहीनी दांडगाई व दहशतीचे प्रदर्शन करून कोमुनिदाद संस्थेवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. या जमिनींवर घरे उभारण्याऱ्यांमध्ये घरे असलेल्यांचाही समावेश आहे. फ्लॅट असलेल्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर स्वत:चा आसरा नसलेले व भाड्याच्या घरात असलेल्यांचाही समावेश आहे. कायद्याबद्दल अनभिज्ञ असलेली अवघी काही कुटुंबे पुढे काय होईल याचा विचार न केल्याने फसलेली आहेत. काही कुटुंबांनी या घरांमध्ये आपला संसार थाटला होता. मात्र, धडक कारवाईमुळे त्यांचे संसार आता उघड्यावर पडलेले आहेत.

नोटीस मिळताच लाखो रूपयांना घर विकले

काहींनी या जमिनीवर घरे बांधून इतरांना विकल्याचेही उघड झाले आहे. गुरूवारी कारवाईच्या वेळी उघडकीस आलेल्या माहितीनुसार वास्कोतील एका व्यक्तीने त्या जमिनीवर जवळपास पस्तीस लाख रूपये खर्चून सिमेंट काँक्रीटचे भव्य घर उभारले. मात्र, घर पाडण्याची नोटीस मिळताच या घराचे त्या व्यक्तीने तीन भाग केले व ज्यांना कारवाईसंबंधी काहीच माहीत नाही अशा तिघा व्यक्तींना प्रत्येकी दहा ते पंधरा लाखांना विकले. अशा प्रकारे काही लोक फसलेले आहेत.

मुरगाव पालिकेने चार अतिक्रमणे हटवली

दरम्यान, मुरगाव नगरपालिकेनेही गुरूवारी सकाळी फकीर गल्ली मांगोरहिल भागातील चार अतिक्रमणांविरूध्ध्द कारवाई केली. या अतिक्रमणांमध्ये दुकाने व कुटुंबे होती. फकीर गल्ली ही खासगी जमिनीवर उभी राहिलेली आहे. मात्र, ज्या अतिक्रमणांविरूध्ध्द पालिकेने कारवाई केली ती अतिक्रमणे तेथील नियोजीत रस्त्याच्या जागेत उभारण्यात आली होती. त्या अतिक्रमणांविरूध्द तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मुरगाव पालिकेने ही कारवाई केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article