महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात 5 वाजेपर्यंत 63.94 टक्के मतदान

06:26 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.94 टक्के मतदान झाले आहे. अभिनेते आणि राजकारण्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावला. तेलंगणामध्ये  प्रामुख्याने बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढत आहे. एकूण 2,290 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता रविवार, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून संपूर्ण देशाला पाच राज्यातील निकालाची प्रतीक्षा आहे.

तेलंगणात गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील 106 मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाले, तर नक्षलप्रभावित 13 मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानासाठी राज्यभरात 35,655 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.  दुपारी 3 वाजेपर्यंत 51.89 टक्के मतदान झाले आहे. तर पाच वाजेपर्यंत हा आकडा 64 टक्क्यांवर पोहोचला होता. अनेक ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या लोकांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे रात्री उशिरा मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article