जंगलात राहते 62 वर्षीय महिला
लाकडी कुटिर केले निर्माण
माणूस मनशांतीच्या शोधात आयुष्यभर भटकत असतो. परंतु अनेकदा त्याला ही शांतता शहरांमधील गर्दीत मिळत नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळते. याचमुळे ऑस्ट्रेलियातील एक ज्येष्ठ महिला नागरिक शहरांना सोडून जंगलात जाऊन राहत आहे. तिने जंगलात स्वत:साठी एक लाकडाचे कूटिर निर्माण केले आहे. हे लाकडी कूटिर अत्यंत सुंदरपणे डिझाइन करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियातील डोना या 62 वर्षांच्या आहेत. त्या जंगलात निर्मित छोट्याशा घरात राहतात. लाकडाच्या केबिनसारखे घर जणू त्यांच्या स्वप्नांचा महाल आहे. याच्या निर्मितीकरता त्यांनी मोठी मेहनत केली आहे. डोना यांना या घराच्या निर्मितीसाठी एक बिल्डर नियुक्त केला होता, डोना यांनी या घराचे इंटिरियल स्वत:च डेकोरेट केले आहे. जुने लाकूड आणि विजेद्वारे संचालित अवजारांचा वापर करत घराचा आतून मेकओव्हर त्यांनी केला आहे.
या घराची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत. दीर्घकाळापासून चाकांवर टिकलेल्या एका छोट्या घरात राहण्याची माझी इच्छा होती. वयाच्या 60 व्या वर्षी मी एक बिल्डर नियुक्त केला आणि स्वत:चे डिझाइन साकारण्यासाठी दिले. हे घर 9 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 2.8 मीटर उंच आहे. माझे बजेट अत्यंत कमी होते, याचमुळे घराला युट्यूबच्या मदतीने मीच सजविण्यास सुरुवात केल्याचे डोना यांचे सांगणे आहे.
अलिकडेच वास्तव्यास प्रारंभ
डोना यांना घर निर्माण करण्याचा कुठलाच अनुभव नव्हता. याचमुळे त्यांनी युट्यूबवरूनच याचे धडे घेतले. याचबरोबर अनेक सोशल मीडिया पेजच्या मदतीने त्यांनी घराला डिझाइन केले आहे. त्या घराला एक छोट्या जुन्या केबिनसारखा लुक देऊ इच्छित होत्या. सुमारे एक महिन्यापूर्वीच त्या स्वत:च्या नव्या घरात रहायला आल्या आहेत. त्यांच्या या घराला पाहून सोशल मीडिया युजर्स दंग होत आहेत.