महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलेच्या डोळ्यात तिखट फेकून पळविले 62 ग्रॅमचे दागिने

11:50 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

चन्नम्मानगर येथील भरदिवसाची घटना, नागरिक भयभीत : भामट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण 

Advertisement

बेळगाव : महिलेच्या डोळ्यात तिखट टाकून तिच्या गळ्यातील 62 ग्रॅमचे दागिने हिसकावून घेऊन एका भामट्याने पलायन केले आहे. सोमवारी भरदिवसा चन्नम्मानगर सेकंड स्टेज परिसरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सकाळी 11.30 ते 12 या वेळेत ही घटना घडली आहे. चेहऱ्याला मास्क लावलेला एक तरुण सेकंड स्टेजवरील मुरगन यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी घरी मुरगन यांची पत्नी प्रियांकादेवी व्यतिरिक्त कोणीच नव्हते. मुरगन हे एल अँड टी कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

Advertisement

दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्यामुळे प्रियांकादेवी यांनी दार उघडले. लगेच भामट्याने त्यांच्या डोळ्यात तिखट टाकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या. नेमके काय घडते आहे? हे कळण्याआधीच भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेनला हिसडा मारून ते खेचले. यावेळी झालेल्या झटापटीत दागिन्याचा एक तुकडा खाली पडला. भामट्याने 62 ग्रॅमचे दागिने पळविले आहेत. या घटनेतून सावरल्यानंतर प्रियांकादेवी यांनी पती मुरगन यांना ही घटना कळविली. लगेच ते आपल्या घरी आले. उद्यमबाग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे डीसीपी निरंजन राज अरस, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. भामट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली असून या पथकातील अधिकारी भामट्याचा शोध घेत आहेत. मुरगन यांचे कुटुंबीय मूळचे तामिळनाडूतील असून नोकरीनिमित्त चन्नम्मानगर सेकंड स्टेज परिसरात त्यांचे वास्तव्य आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia