पोलीस दलातील निकामी वाहने विक्रीतून 60 लाखाचा महसूल गोळा
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा पोलीस दलाकडील वापरात नसणारी निकामी 66 चारचाकी, 105 दुचाकी अशा 171 वाहने व इतर सा†हत्य विक्रीतुन शासनास मिळाला 59 लाख 68 हजार इतका महसुल मिळाला. ही विक्री प्रक्रीया नुकतीच पूर्ण करण्यात आली. वाहन विक्रीमुळे अनेक दिवसांपासुन ही वाहने असणार्या जागेने मोकळा श्वास घेतला.
अपर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशानुसार पोलिस दलाकडील वापरात नसणारी निकामी पोलीस वाहने व साहीत्य यांची विक्री करण्याची प्रक्रीया राबवण्यात आली. यासाठी केंद्र शासन पुरस्कृत एम.एस.टी.सी एजन्सी मार्फत ऑनलाईन पध्दतीने ही प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.
सांगली जिल्हा पोलीस दलातील 15 वर्षावरील 25 चारचाकी वाहने, 90 दुचाकी वाहने अशी एकुण 115 वाहने स्क्रैप करणेसाठी अधिकृत आर.व्ही.एस.एफ सेंटर श्री भाग्यलक्षमी रोलींग मिल प्रा.लि. जालना यांनी उच्चत्तम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रैप करणेकामी देण्यात आलीत उर्वरीत 41 चारचाकी व 15 दुचाकी अशी एकुण 56 वाहने व इतर निकामी साहीत्य उच्चत्तम बोली लावणा-या बोलीदार यांना देण्यात आलीत. त्याच्या विक्रीतुन शासनास 59 लाख 68 हजार इतका महसुल जमा करणेत आला.
या वाहन विक्रीतुन शासनास निधी झमा झालाच मात्र त्याचवेळी पोलिस मुख्यालयात अनेक दिवसांपासुन या वाहनांमुळे अडकलेली जागा मोकळी झाली. त्या ठिकाणची स्वच्छता केली गेल्यानंतर परिसर कायम स्वच्छ ठेवता येणार आहे. निकामी वाहनाची विक्री कऊन पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करणेत आली.
जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, पोलीस उपअधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सचिन दंताळ, मो.प पर्यवेक्षक विकास कोठावळे, सहाय्यक पोलिस फौजदार बापु गायकवाड पोलिस हेड कॉन्स्टेंबल संदीप गवळी, गणेश चव्हाण, सचिन पवार, पोलिस नाईक अजय कांबळे यांनी कार्यवाही केली.