महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

6 दहशतवादी ठार; दोन जवान हुतात्मा

06:41 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुलगाममध्ये दोन दिवसांपासून दोन ठिकाणी चकमक ; दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून सुरक्षा दलांनी घुसखोरांविरोधात केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच लष्कराच्या दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्निगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. रविवारी मोदरगाम गावात दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेल्या दोन चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या सहा झाली. गावात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संयुक्तपणे कुलगामच्या मोदरगाम गावात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली होती.

कुलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलीस दलाने शनिवारी दुपारपासून संयुक्त मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल घराजवळ येताच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात एक जवान जखमी झाल्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच लष्कराच्या ऊग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

गोळीबाराच्या घटनेनंतर अतिरिक्त फौजफाटा मागवून कुलगाम जिह्यातील फ्रिसल चिन्निगाम भागात शोधमोहीम व्यापक केल्यानंतर पुन्हा चकमक सुरू झाली.  रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. चकमक झालेल्या घराच्या आवारात चार दहशतवाद्यांचे मृतदेह ड्रोन फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून शकील अहमद वानी, यावर बशीर दार, जाहिद अहमद दार आणि तौहीद अहमद राथेर अशी त्यांची ओळख पटली आहे.

मोदरगाममध्ये आणखी दहशतवादी लपून बसले असून त्यांनीही घरातून गोळीबार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर चकमक झडली. या दुसऱ्या घटनेनंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. अमरनाथ यात्रा सुरू असतानाच ही चकमक झाली असून दहशतवादी संघटनांनी भाविकांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article