महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांचा सहा लाखांचा गंडा

11:00 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉक्टरना बनवले ‘मामा’ : जिल्हा सीईएन पोलिसात तक्रार दाखल

Advertisement

बेळगाव : सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जनजागृती करूनही सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना फशी पडणाऱ्या नागरिकांची संख्या काही कमी होईना. ऑनलाईनच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा देऊ, असे आमिष दाखवत एका डॉक्टराना सहा लाख रुपयांना ठकवण्यात आले आहे. ट्रेडिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सुरूच आहेत. सिद्धेश्वरनगर येथील मोहम्मदइलियास नियाजअहमद दर्गा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना 5 लाख 92 हजार 990 रुपयांना ठकवल्याचे सामोरे आले आहे.मोहम्मदइलियास यांच्या पत्नीच्या मोबाईलवर दि. 27 एप्रिल 2023 रोजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्रुप तयार झाला.

Advertisement

त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची नावे गुंतवणुकीसाठी सूचविण्यात आली होती. या कंपन्यात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असा उल्लेख करण्यात आला होता. गुंतवणूक करणारे अनेक जण सध्या फायद्यात आहेत, याविषयी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या भामट्यांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी टप्प्याटप्प्याने भामट्यांच्या बँक खात्यांना 5 लाख 92 हजार 990 रुपये जमा केले. त्याच्या बदल्यात त्यांच्या ए अँड आर कॅपिटल अॅप्लिकेशनमध्ये 10 लाख रुपये जमा दाखवण्यात आले. ही रक्कम काढायची असेल तर किमान 25 लाखांचा व्यवहार करा. नहून ही रक्कम परत मिळणार नाही. तुमचे बँक खातेही गोठवण्यात येईल, असे भामट्यांनी सांगितल्यामुळे आपण फसलो गेलो, याची डॉक्टरांना कल्पना आली. सायबर क्राईम विभागात जाऊन त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article