महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून ६ लाखांची फसवणूक

12:20 PM Aug 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
sugarcane workers
Advertisement

सांगली प्रतिनिधी

उसतोड मजूर पुरवतो सांगून ६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित बळीराम यशवंत हाके (रा. जुनोनी, ता. सांगोला) व सहकारी चंद्रकांत तातोबा आवळे (रा. करंजे, ता. खानापूर ) या दोघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत आण्णा हौजे (वय 76, रा. मौजे डिग्रज) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Advertisement

अधिक माहिती अशी, संशयित बळीराम हाके आणि सहकारी चंद्रकांत आवळे या दोघांनी हौजे यांनी दि. 12 सप्टेंबर 2019 व दि. 30 ऑक्टोंबर 2019 रोजी उसतोड मजूर पुरवतो असे सांगून त्यांच्याकडून सहा लाख रूपये घेतले होते. त्यानंतर कारखाना गळीत हंगामात उसतोड मजूर पुरवले नाहीत. पैशाची विचारणा केल्यानंतर गेले तीन- चार वर्षे टोलवाटोलव केली. त्यामुळे हौजे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Advertisement

Advertisement
Tags :
fraudsugarcane workers
Next Article