कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठवड्यात 6 आयपीओ शेअर बाजारामध्ये खुले होणार

06:36 AM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फूड चेन, फार्मा कंपन्यांचा समावेश : ट्रॅव्हल फूडचा आयपीओ खुला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यामध्ये  6 आयपीओ शेअर बाजारामध्ये खुले होणार आहेत. यामध्ये एक मेन बोर्डवर तर इतर पाच कंपन्यांचे आयपीओ एसएमइमध्ये खुले होतील. फूड चेन, फार्मा व ऊर्जा क्षेत्रातले आयपीओ या आठवड्यात सादर होणार आहेत.

ट्रॅव्हल फूड उभारणार 2 हजार कोटी

मुंबई स्थित ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचा आयपीओ 7 जुलैला खुला झाला असून 9जुलैला बंद होणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. भारत आणि मलेशियातील विमानतळांवर क्विक सर्विस रेस्टॉरंट व लाऊंजची सेवा ही कंपनी पुरवते. आयपीओ अंतर्गत कंपनी 1.82 कोटी समभाग विक्री करणार असून समभागाची किंमत 1045-1100 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. 14 जुलैला एनएसई व बीएसईवर समभाग सुचिबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आठवड्यात एसएमई गटामध्ये 5 आयपीओ खुले होणार आहेत. ग्लेन इंडस्ट्रीजचा आयपीओ 8 जुलैला खुला होणार असून 63.02 कोटी रुपये कंपनी उभारणार आहे. 92 ते 97 रुपये अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 4800 समभाग खरेदी करावे लागणार आहेत.

केमकार्ट इंडियाचा आयपीओ 7 जुलैला खुला झाला असून 9 रोजी बंद होणार आहे. 80.08 कोटी रुपये आयपीओतून उभारले जाणार असून 236 ते 248 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 64.48 कोटी रुपयांचे ताजे समभाग विक्रीस उपलब्ध असतील. कमीत कमी 2400 समभाग खरेदी करण्याची अट घालण्यात आली आहे.

स्मार्टन पॉवर सिस्टीमचा आयपीओ 7 जुलैला खुला झाला असून 9 जुलैला बंद होणार आहे. 50 कोटी रुपये उभारले जाणार असून 40.01 कोटीचे ताजे समभाग कंपनी सादर करेल. 100 रुपये समभागाची किंमत असून कमीत कमी 2400 समभाग खरेदी करावे लागणार आहेत.

सीएफएफ फ्ल्यूड कंट्रोल या कंपनीचा आयपीओ बाजारात येणार असून कंपनी 87.75 कोटी रुपयांचे समभाग बाजारात सादर करणार आहे. 9 ते 11 जुलै दरम्यान आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला आहे. 585 रुपये अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली असून गुंतवणूक करायची झाल्यास गुंतवणूकदारांना किमान 400 समभाग खरेदी करणे आवश्यक असणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article