महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बीआरएसच्या 6 आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

06:44 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुरुवारी मध्यरात्री केले पक्षांतर

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे सत्र सुरूच आहे.  विधान परिषदेतील बीआरएसच्या 6 आमदारांनी गुरुवारी मध्यरात्री तेलंगणाच्या सत्तारुढ पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी  यांच्या उपस्थितीत हे 6 आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले.

दांडे विटल, भानुप्रसाद राव, एम.एस. प्रभाकर, बोग्गापारु दयानंद आणि एग्गे मल्लेशम अशी या आमदारांची नावे आहेत. तत्पूर्वी 28 जून रोजी चेवेल्ला येथील बीआरएसचे आमदार काले यादैया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेलंगणाच्या जगतियाल येथील बीआरएस आमदार संजय कुमार यांनी रविवारी सत्तारुढ काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर बीआरएसचे वरिष्ठ आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांनी 21 जून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता.

तत्पूर्वी बीआरएसचे आमदार कादियाम श्रीहरि, दानम नागेंद्र, टेलम वेंकट राव यांनीही काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले होते. हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी आर. गडवाल यांच्यासमवेत अनेक बीआरएस नेत्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणा विधान परिषदेत बीआरएसचे 25 सदस्य होते, तर काँग्रेसचे केवळ 4 सदस्य होते. 6 आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ आता 10 पर्यंत वाढले आहे. आगामी काळात बीआरएसचे अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून बीआरएस स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहे.

बीआरएसकडून काँग्रेस लक्ष्य

बीआरएसचे राज्यसभा खासदार पेशव राव यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. बीआरएसच्या आमदारांना फोडून स्वत:च्या पक्षात घेत राहुल गांधी हे राज्यघटनेचे रक्षण करणार आहेत का असा प्रश्न बीआरएसने विचारला आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांनी राजीनामा दिला नसतानाही त्यांना पक्षात प्रवेश देणे राज्यघटनेनुसार योग्य आहे का असा सवालही बीआरएसने राहुल गांधी यांना विचारला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article