कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

6.5 किलो सोने, 41 लाखांची रोकड जप्त

11:18 AM Sep 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती : चडचण येथील एसबीआय बँक चोरी प्रकरण, दरोडेखोरांना पकडण्यासाठी 8 विशेष तपास पथके

Advertisement

वार्ताहर/विजापूर

Advertisement

जिल्ह्यातील चडचण शहरातील एसबीआय बँकेवरील दरोडा प्रकरणाचा तपास करताना पहिल्या टप्प्यात 136 पॅकेट्समधील 6.5 किलो सोने आणि 41 लाख 4 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. शुक्रवारी शहर पोलीस स्थानकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निंबरगी पुढे म्हणाले, मंगळवार 16 रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान बँकेत चोरीची घटना घडली होती. त्यावेळी एसबीआय बँकेतून सुमारे 398 पॅकेट्समधून 20 किलो सोने आणि 1 कोटी 4 लाख रोकड चोरी करण्यात आली होती. त्याचदिवशी मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील हुलजंती गावात दरोड्यात वापरलेल्या वाहनाचा अपघात झाला आणि स्थानिकांसोबत दरोडेखोरांची झटापट झाली.

त्यावेळी दरोडेखोरांनी काही लोकांना धमकावून काही बॅग्स घेऊन दरोड्यात वापरलेले वाहन सोडून पळ काढला होता. पोलिसांनी रात्री उशिरा दरोड्याच्या वाहनाचा ताबा घेतला. त्यात 21 सोन्याचे पॅकेट्स आणि 1 लाख 3 हजार रोख सापडले. मंगळवारी रात्रीपासून सोलापूर जिल्हा पोलीस आणि विजापूर जिल्हा पोलिसांनी हुलजंती गावाला पूर्णत: वेढा घातल्यामुळे दरोडेखोरांना सुमारे 25 किलो वजनाची बॅग घेऊन पळणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी गावातील एका रिकाम्या घराच्या छपरावर तांदळाच्या पोत्यामध्ये सोने आणि रोकड ठेवून पलायन केले.

मंगळवेढ्यात वाहन चोरीचा गुन्हा 

घटनास्थळी तपास करत असताना गुरुवारी सायंकाळी त्या छपरावरून 136 पॅकेट्समधून 6.5 किलो सोने आणि 41 लाख 4 हजार रोकड हस्तगत करण्यात आली आहे. दरोड्यात वापरलेले वाहनसुद्धा चोरीचे असून महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे या वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. सोलापूर जिल्हा पोलीस आणि विजापूर जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त सहकाऱ्याने तपास वेगात सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. दरोडेखोरांना पकडण्यासाठी 8 विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त एसपी रामनगौड हत्ती उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article