For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरबी समुद्रात 6-10 युद्धनौका तैनात

06:35 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरबी समुद्रात 6 10 युद्धनौका तैनात
Advertisement

एडनच्या आखातापर्यंत राहणार कमांडो : जहाजांवरील चाच्यांचे हल्ले रोखणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाने अरबी समुद्रापासून एडनच्या आखातापर्यंत सुमारे 10 युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांवर असणारे मरीन कमांडोज हे सोमालियन सागरी चाच्यांपासून जहाजांना वाचविणार आहेत.

Advertisement

अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवरील हल्ले वाढत आहेत. या जहाजांना सागरी चाच्यांपासून वाचविणे आणि त्यांचे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी सोमालियाच्या किनाऱ्यानजीक, अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात विध्वंसिका, फ्रीगेट्स आणि गस्तनौकेसमवेत 6-10 युद्धनौका तैनात करण्यात आल्याची माहिती नौदलाने दिली आहे.

प्रत्येक घटनेवर असणार नजर

अरबी समुद्रात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर आमची नजर असणार आहे. तैनात करण्यात आलेल्या युद्धनौका समुद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी सज्ज असतील आणि सर्वप्रकारच्या स्थितीवर नजर ठेवून राहतील असे नौदलाकडून सांगण्यात आले. मागील 42 दिवसांमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ल्याच्या 35 घटना घडल्या आहेत, परंतु कुठल्याही भारतीय जहाजावर हल्ला झालेला नाही.

भारतीयांचे रक्षण

19 नोव्हेंबर रोजी हूती बंडखोरांनी कार्गो शिप गॅलेक्सी लिडरचे अपहरण केले होते, या जहाजाच्या चालक दलाच्या सदस्यांमध्ये 25 जण भारतीय होते. अरबी समुद्रात ज्या जहाजांवर हल्ले झाले आहेत, त्यातील चालक दलाच्या सदस्यांमध्ये भारतीयांचा समावेश होता. भारतीय नौदलाने हल्ल्यांची माहिती कळताच तातडीने पावले उचलली होती.

Advertisement
Tags :

.