For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचवा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 13 रोजी

03:33 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
पाचवा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 13 रोजी
Advertisement

डॉ. सोमनाथ, डॉ. काकोडकर यांच्यासह नामवंत शास्त्रज्ञांची उपस्थिती

Advertisement

पणजी : पाचवा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन बुधवार 13 डिसेंबर रोजी करण्यात आले असून सकाळी 10 वा. महोत्वाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करणार आहेत. दोनापावला येथील एनआयओमध्ये हा महोत्सव होणार असून त्या वेळी डॉ. माधवराज एस. यांना मनोहर पर्रीकर शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात येणार आहे. इस्त्रोचे चेअरमन डॉ. श्रीधर सोमनाथ, डॉ. अनिल काकोडकर व संबंधित क्षेत्रातील मान्यवर मंडळी महोत्सवासाठी उपस्थित रहाणार आहेत. सकाळी प्रथम उद्घाटन सत्र होणार असून त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत तांत्रिक सत्र आखण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात गोव्यातील विविध ठिकाणी त्याच दिवशी विविध कार्यक्रम होणार असून त्यात मान्यवरांची व्याख्याने, भाषणे आयोजित करण्यात आली आहेत.

डॉन बॉस्को कॉलेज फातोर्डा-मडगाव, राजीव गांधी कला मंदिर- फोंडा, सरकारी कॉलेज-केपे, सरकारी कॉलेज-पेडणे, सरकारी उच्च माध्यमिक शाळा काणकोण, रवींद्र भवन-साखळी, बिटस् पिलानी-झुवारीनगर, सदाशिव मराठे समाजमंदिर-धारबांदोडा या ठिकाणी महोत्सवाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. सर्व कार्यक्रम सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान होणार आहेत. गोव्याबाहेरील विविध क्षेत्रातील मान्यवर तेथे उपस्थित राहून व्याख्याने देणार आहेत. वरील सर्व ठिकाणी जनतेने, विद्यार्थी वर्गाने उपस्थित रहावे आणि सर्व कार्यक्रम, महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव दरवर्षी आखण्यात येतो. पणजीचे आमदार व विज्ञान तंत्रज्ञानमंत्री बाबुश मोन्सेरात हे हजेरी लावणार असून त्याच खात्याने महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.