महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

7 कंपन्यांच्या भांडवलात 59 हजार कोटींची वाढ

06:20 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँकेचे भांडवल सर्वाधिक वाढले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या दहापैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 59 हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे.

आघाडीवरच्या 7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 59,404 कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवड्यात शेअर बाजाराचे ईदच्या सुट्टीमुळे चारच दिवस काम झाले होते. मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक यादरम्यान 3.32 अंकांनी घसरला होता. पण याच दरम्यान सेन्सेक्सने बुधवारी 75 हजार 38 अंकांची नवी उच्चतम पातळी देखील गाठली होती. कंपन्यांचा विचार करता भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली होती.

कोणत्या कंपन्या नफ्यात

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 19 हजार 29 कोटी रुपयांनी वाढून 6 लाख 92 हजार 861 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 15363 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 75 हजार 447 कोटी रुपयांवर पोहोचले होते.

दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 10 हजार 250 कोटी रुपयांनी वाढून 19 लाख 85 हजार 797 कोटी रुपये झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article