महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयआयटी मुंबईला 57 कोटीची देणगी

06:43 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मुंबईच्या आयआयटी महाविद्यालयाला याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून 57 कोटी रुपयांची घसघशीत देणगी मिळाली आहे. या महाविद्यालयाला ही आतापर्यंतची मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जात आहे. हे विद्यार्थी 1998 मध्ये या महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले होते. 1998 च्या बॅचचे यंदा रजतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने ही देणगी देण्यात आली आहे.

Advertisement

1998 च्या वर्षातील 200 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही देणगी दिली. या 200 विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार या देणगीत त्यांचे योगदान केल्याची माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण आता उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्यात जागतिक पातळीवरील काही नावाजलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. व्हेक्टर कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम बॅनर्जी, सिल्व्हर लेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना, ग्रेट लर्निंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लाखमराजू, पीक एक्सव्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग, अमेरिकाज एचसीएल कंपनीचे मुख्य वृद्धी अधिकारी श्रीकांत शेट्टी आणि इंडोव्हान्स कंपनीचे सहव्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश जोशी तसेच इतर अनेक कंपन्यांचे अधिकारी यांचा देणगीदारांमध्ये समावेश आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनीही काही महिन्यांपूर्वी अशीच मोठी देणगी मुंबई आयआयटीसाठी दिली होती. ती साधारणत: 41 कोटी रुपयांची होती. मात्र या नव्या देणगीमुळे हा विक्रम मागे पडला आहे.

ज्या शिक्षणसंस्थांमध्ये आपण शिकलो आणि तेथून विद्या घेऊन उच्च पदांवर पोहचलो, त्या शिक्षणसंस्थांना आपल्या उत्पन्नातून मोठ्या देणग्या देऊन अधिक विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यास सक्षम करण्याची प्रथा युरोप आणि अमेरिकेत पूर्वीपासून आहे. मात्र, भारतात आता या परंपरेचा प्रारंभ होत आहे. गेल्या दशकभरात अनेक भारतीय उच्चविद्याविभूषित विद्यार्थी जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषवीत आहेत. त्यांनी आता ही प्रथा आपल्या देशात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article