For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाँगकाँग येथे भीषण आगीत 55 ठार

07:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
हाँगकाँग येथे भीषण आगीत 55 ठार
Advertisement

300 हून अधिक अद्यापही बेपत्ता, इमारत खाक

Advertisement

वृत्तसंस्था/हाँगकाँग

हाँगकाँगमधील एका व्यापारी-निवासी संकुलाला बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत 55 लोकांचा बळी गेला आहे. 300 हून अधिक जण अद्यापही बेपत्ता असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत ही आग भडकलेली होती. त्यानंतर तीन नियंत्रणात आणण्यात आली आहे. या संकुलाची बांधणी सदोष असल्याने आग भडकली, असे प्राथमिक तपासात दिसून आले असून इमारतीच्या बांधकामकर्त्यावर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement

आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. ती शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी माहिती देण्यात आली. संकुलाचे बांधकाम सदोष असल्याने पाण्याचे बंब आतपर्यंत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे आग लवकर विझविता आली नाही. परिणामी जिवीत हानी मोठ्या प्रमाणावर झाली. या संकुलात 2 हजार सदनिका आहेत. तसेच 4 हजार 600 नागरीक त्यात रहात आहेत. या नागरिकांना आग लागल्यानंतर लवकर बाहेर पडणेही अशक्य झाले होते. हाँगकाँगमध्ये वाजवी दरात घरे मिळत नसल्याने अशा संकुलांमध्ये राहण्याची वेळ नागरीकांवर येत आहे.

आठ विभागांचे संकुल

हे संकुल आठ ब्लॉक्सचे बनलेले आहे. त्यांच्यापैकी एका ब्लॉकच्या एका इमारतीला आधी आग लागली. सर्व भाग पुरेसे अंतर सोडून बांधलेले नसल्याने आग त्वरित इतर इमारतींमध्येही पसरली. रात्रीची वेळ असल्याने बहुतेक निवासी नागरीक आपापल्या घरीच होते. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनेकांना त्यात यशही आले. तथापि किमान 300 नागरीक इमारतींमध्येच अडकलेल्या स्थितीत होते. बाहेर पडलेल्या नागरीकांपैकीही अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध त्यांच्या नातेवाईकांकडून घेतला जात आहे. या आगीत अनेक काही कुटुंबे नाहीशी झाली असावीत, असे अनुमान आहे. किमान 100 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर हाँगकाँगमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत.

कागदपत्रे हस्तगत

या संकुलाच्या संरचनेसंबंधीची कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहेत. तसेच, या संकुलाच्या व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व ज्या कंपनीवर होते, तिच्या चालकांचा शोध घेतला जात आहे. कंपनीच्या संचालकांना अटक करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. मात्र, कंपनीने अद्याप या घटनेसंबंधी वक्तव्य केलेले नाही.

तीन लोकांना अटक

या आग प्रकरणी आतापर्यंत तीन लोकांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या संकुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनाही अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्या चौकशीनंतर आगीच्या नेमक्या कारणांचा शोध लागणार आहे. पण हा घातपात नसून मानवी चुकीमुळे घडलेला अपघात आहे, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दुसरा मोठा आग अपघात

हाँगकाँगमध्ये घडलेला हा 1948 नंतरचा दुसरा सर्वात मोठा आग अपघात आहे. 1948 मध्ये एका कोठाराला लागलेल्या आगीत 176 जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी लागलेली ही आग विझविण्यासाठी हाँगकाँगच्या अग्निशमन दलाचे 1 हजार 200 कर्मचारी किमान सलग 12 तास प्रयत्न करीत होते.

Advertisement
Tags :

.