महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा 25 नोव्हेंबर 2023

12:49 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्करच्या मार्गावर उत्कृष्ट बनण्यासाठी चित्रपटाचे वितरण ही गुऊकिल्ली

Advertisement

‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर यांचे मत

Advertisement

ऑस्कर जिंकण्याचे मार्ग आजही अनेकांसाठी अवघड, गूढ म्हणावेत असेच आहेत. भारताच्या 54 व्या इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी आयोजित केलेल्या इन-कनर्व्हसेशन’ संवाद सत्रामध्ये यामागचे गूढ उलगडले आणि जणू ऑस्कर जिंकण्याचे मार्ग मोकळे झाले. ऑस्करच्या मार्गावर उत्कृष्ट बनण्यासाठी चित्रपटाचे वितरण ही गुऊकिल्ली आहे. अकादमी पुरस्कारांच्या शर्यतीत अमेरिकेमध्ये वितरित केलेल्या चित्रपटांनी सुऊवात होते. भारतातील ऑस्करसाठी चित्रपटांची निवड करणाऱ्या समितीने चित्रपट निवडून येण्याची शक्मयता वाढवणे आवश्यक आहे, असे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर यांनी  सांगितले. याशिवाय जागतिक स्तरावर चित्रपटांना ठळकपणे दाखविण्यासाठी चित्रपट महोत्सवांच्या भूमिकेवर भर देणे महत्त्वाचे आहे. ऑस्करमध्ये चित्रपटांना पुरस्कार मिळण्याची शक्मयता वाढवण्यासाठी,तो चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला पाहिजे आणि तेथे पुरस्कार जिंकले पाहिजेत, याचा गुनीत कपूर यांनी पुनऊच्चार केला.

रसूल पुकुट्टी म्हणाले की, भारत जेव्हा एखादा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी पाठवतो, तेव्हा त्या चित्रपटाने आपल्या देशाचे आणि इथल्या विविधतेचे प्रतिनिधित्व करायला हवे. आपण जेवढे आपल्या देशाशी एकरुप होतो, तेवढेच सार्वत्रिक बनतो. आपल्या देशाची भूमिका मांडणारी कल्पना देखील एक जागतिक विचार बनू शकते. सरकार भारतीय चित्रपटांना त्यांच्या ऑस्कर प्रवासात मदत करण्यासाठी एक निधी स्थापन करू शकते. जेणेकरून ते जनसंपर्क संस्थांच्या मदतीने ही मोहीम यशस्वीपणे राबवू शकतील. ऑस्करसाठी चित्रपट निवडण्याची प्रक्रिया निरोगी आणि स्पर्धात्मक असायला हवी, युवा चित्रपट निर्मात्यांनी केवळ ऑस्करच्या ध्येयाने प्रेरित राहू नये. कारण तोच एक चित्रपट निर्मितीच्या सर्वोत्तमतेचा मापदंड नाही, असेही ते पुढे म्हणाले. शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस (एएमपीएएस) आणि ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) या दोन्हींचे सदस्य कार्टर पिल्चर हे देखील या सत्राला उपस्थित होते. उत्तम कथा आपल्याला पुरस्कार मिळवून देतात, आणि भारताकडे सांगण्यासाठी अनेक आशय संपन्न कथा आहेत, असे पिल्चर यांनी सांगितले.

ओटीटीवर सर्व प्रकारच्या चित्रपटांना संधी मिळणे आवश्यक : मनोज वाजपेयी

जेव्हा भारतात ओटीटी माध्यमाची सुरुवात झाली तेव्हा अनेक स्वतंत्र चित्रपटांना संधी मिळाली. त्यामुळे बिग बजेट नसलेल्या तसेच या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना एक भक्कम माध्यम मिळाले. परंतु मागील काही वर्षात हेच माध्यम स्वतंत्र चित्रपटांना संधी देण्यासाठी नाकारत असल्याने ती चित्रपटसृष्टीसाठी घातक आहे. चित्रपटसृष्टी टिकवायची असेल तर ओटीटी माध्यमांनी स्वतंत्र चित्रपटांना संधी देणे आवश्यक आहे. याशिवाय विविध प्रकारच्या चित्रपटांनासुद्धा संधी मिळणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांनी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कला अकादमीत ‘क्राफ्टिंग कॉम्पिलिंग वेबसीरिज फॉर ओटीटी’ या विषयावर आयोजित केलेल्या इन कन्व्हर्सेशन सत्रात बोलताना व्यक्त केले.   कलाकारांनी अगोदर शिकलेल्या सर्व गोष्टी विसरणे आवश्यक असते. त्याला अनलर्निंग असे म्हटले जाते. पूर्वी मी एखाद्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला जाताना खूप तयारी करून जात असे. ज्यामुळे माझ्यातील शिकण्याची प्रक्रिया बंद झाली. दिग्दर्शकाने काही नवीन गोष्टी सांगितल्या तर मला पटतही नव्हत्या. मग वाद होत असत. काही काळानंतर जी गोष्ट आपण करत आहोत ती चुकीची असल्याची जाणीव मला झाली आणि त्यात बदल करून मी जास्त रिहर्सलला प्राधान्य दिले. अभिनेत्याला त्याच्या पात्राच्या भाव-भावना, तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे, त्याची मानसिक स्थिती काय आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांचेदेखील निरीक्षण करणे गरजेचे असते. माझ्याशी बोलणारा, माझ्या बाजूला, माझ्या पुढून चालत जाणारा माणूस काय करतो याचे निरीक्षण करावे लागते. अभिनय करियर हे मला यासाठी आवडते. यामुळे मला माणसांची निरीक्षण करण्याची संधी मिळते, असेही पुढे मनोज यांनी सांगितले.

परिवर्तनाच्या प्रवासाला माहितीपट देतात चालना

माहितीपटावरील मास्टरक्लासमध्ये उमटले तज्ञांचे सूर

भारतीय माहितीपटांनी जागतिक स्तरावर ओळख मिळविली आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन आणि प्रशंसेला पात्र ठरली आहे. तथ्यावर आधारित कथा वास्तविकतेत त्यांचे सत्य शोधतात, शिकण्याच्या आणि परिवर्तनाच्या समृद्ध प्रवासाला चालना देतात. माहितीपटांसाठी साहाय्यक व्यवस्थांना बळ देण्यात सहकार्य महत्त्वपूर्ण आहे, असे मत प्रख्यात माहितीपट निर्माती कार्तिका गोन्साल्वीस यांनी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून जागतिक स्तरावर ‘भारतीय माहितीपट’ या विषयावर आयोजित केलेल्या मास्टरक्लास सत्रात बोलताना व्यक्त केले. यावेळी आर. व्ही. रमाणी, मिरियम चंडी मेनाचेरी, साई अभिषेक आणि नीलोत्पल मजुमदार उपस्थित होते. माहितीपट निर्मितीचे प्राथमिक सार तथ्यात्मक कथांचे प्रामाणिक चित्रण करण्यात येत आहे आणि यातून मिळणारा पैसा दुय्यम बाब असल्याचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आर. व्ही. रमाणी यांनी सांगितले. माहितीपटाची आवड त्याची कथा सांगणाऱ्यांना प्रेरित करत असली तरीही वित्तपुरवठा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणेच नवोदित निर्मात्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, अशी वेगळी भूमिका दिग्दर्शिका आणि निर्माती मिरियम चंडी मेनाचेरी यांनी मांडली. माहितीपट क्षेत्रातील आघाडीचे निर्माते साई अभिषेक यांनी भारताच्या आशावादी माहितीपटाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, उत्साही प्रेक्षक आहेत. मात्र, मुख्य प्रवाहातील सिनेमाशी तुलना करता येईल, अशा मजबूत परिसंस्थेची कमतरता आहे. फिल्म क्लब आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेल यासारख्या साहाय्यक व्यवस्था महत्त्वपूर्ण आहेत, यावरही त्यांनी भर दिला. माहितीपट निर्माते नीलोत्पल मुझुमदार म्हणाले, माहितीपट निर्मिती कथाकथनाला काल्पनिकतेपासून मुक्त करते. जीवनाशी संवाद साधते आणि सामायिक मानवी अनुभवांद्वारे जोडले जाण्याशी संबंधित आहे.

व्यापकतेने गुजराती चित्रपटसृष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे काळाची गरज

ज्येष्ठ गुजराती अभिनेता सिद्धार्थ रांडेरिया यांचे मत

आपल्या देशातील इतर प्रदेशांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुजराती चित्रपटांना इफ्फीसारख्या व्यासपीठांची आवश्यकता आहे. अडथळे दूर करणे आणि अधिक व्यापकतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे ही गुजराती चित्रपटसृष्टीसाठी काळाची गरज आहे, असे ज्येष्ठ गुजराती अभिनेता सिद्धार्थ रांडेरिया यांनी गोव्यातील 54 व्या इफ्फीमध्ये ‘हुर्रे ओम हुर्रे’ या चित्रपटाच्या प्रीमियर निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ‘गुजराती चित्रपटांचे सौंदर्य आणि त्यातील चित्तवेधक कथाकथन याबद्दल जागरुकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. 54 व्या इफ्फीमध्ये ‘हुर्रे ओम हुर्रे’च्या प्रीमियरबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेता रौनक कामदार यांनी, अलिकडच्या वर्षांत हिलारोसारख्या अनेक समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या गुजराती चित्रपटांना इफ्फीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. ‘हुर्रे ओम हुर्रे’ या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना दिग्दर्शक निसर्ग वैद्य म्हणाले की, या चित्रपटात गुजराती समाजाच्या भावना बारकाईने टिपल्या असून त्यांची संस्कृती त्यातून प्रतिबिंबित होते. प्रेक्षकांशी समरस होणे आणि शक्मय तितक्मया स्वरुपात वास्तववादी कथा मांडणे याचा प्राधान्याने विचार केला जातो. प्रत्येक प्रदेशाची स्वत:ची संस्कृती आहे, म्हणूनच तो विलक्षण असतो. चित्रपटातील नर्मविनोदी आशय प्रेक्षकांना पडद्याशी खिळवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चित्रपटाचा सारांश: दीर्घकाळापासूनचे मित्र असलेले ओम आणि विनी यांच्याविषयीचा हा चित्रपट आहे. जेव्हा विनीने ओमसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यानंतर एकेकाळी एकमेकांमध्ये गुंतलेल्या त्या दोघांमध्ये ओममुळे दुरावा येऊ लागतो आणि विश्वासघाताच्या भावनेने विनी अस्वस्थ होते. अशा निराश अवस्थेत, त्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारी अनपेक्षित घटना घडते, आणि त्यातून त्यांच्या जगण्याचा मार्गच बदलतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article