आयुष्मान योजनेत जिल्ह्यातील 51 हॉस्पिटल्स
सातारा :
सर्वसामान्य रुग्णांना आजारपणांवर चांगले उपचार मिळावेत, यासाठी आयुष्यमान भारत मिशन व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. त्याकरता आयुष्यभान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेत जिह्यातील 51 हॉस्पिटल्स सहभागी आहेत. एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षात जिह्यातील 19 हॉस्पिटल्सनी 7 हजार 449 रुग्णांवर उपचार केले आहेत. त्याचा आढावा महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी बैठकीत घेतला.
आयुष्यमान भारत योजना ही प्रभावीपणे राज्यात राबवण्यासाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र या नावाने समिती गठीत केली आहे. त्या समितीच्या माध्यमातून सेवा दिल्या जात आहेत. समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे हे आहेत. त्यांनी साताऱ्यात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी हॉस्पिटल्समध्ये आलेले रुग्ण, रुग्णांना दिलेली सेवा, येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांसाठी जिह्यातील 51 हॉस्पिटल्स आहेत. त्यामध्ये शासकीय रुग्णालय सातारा, संजीवन हॉस्पिटल सातारा, यशवंत हॉस्पिटल सातारा, श्री मंगलमूर्ती क्लिनिक अॅण्ड रिसर्च सेंटर, अन्को कॅन्सर सेंटर शेंद्रे, सिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कराड, शारदा क्लिनिक कराड, कृष्णा हॉस्पिटल कराड, सह्याद्री हॉस्पिटल कराड, कोळेकर हॉस्पिटल कराड, आर. एच. उंडाळे, के. एन. गुजर हॉस्पिटल कराड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, लाईफलाईन हॉस्पिटल फलटण, निकोप हॉस्पिटल, चिरजीवन हॉस्पिटल फलटण, उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव, श्रीरंग नर्सिंग होम कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय पिंपोडे, मानसी ममोरियल खंडाळा, ग्रामीण रुग्णालय खंडाळा, सावित्री हॉस्पिटल खंडाळा, श्री साई हॉस्पिटल लोणंद, समर्थ चॅरिटेबल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय सोमर्डी, ग्रामीण रुग्णालय मेढा, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, घोटवडेकर हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय काशीळ, गितांजली हॉस्पिटल वाई, बेल एअर हॉस्पिटल वाई, ग्रामीण रुग्णालय वाई, बी. जे. काटकर हॉस्पिटल वडूज, कृष्णाई आयसीयू, स्पंदन हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय कलेढोण, ग्रामीण रुग्णालय औंध, ग्रामीण रुग्णालय वडूज, धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड, डोलताडे हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय दहिवडी, ग्रामीण रुग्णालय गोंदवले, लाईफ लाईन हॉस्पिटल मायणी, जय भगवान हॉस्पिटल म्हसवड, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी, देवा हॉस्पिटल वडूज अशा 51 हॉस्पिटलच्या माध्यमातून या योजनेची सेवा दिली जाते.
एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षात जिह्यातील 19 हॉस्पिटल्सनी 7 हजार 449 रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यात 7 हजार 250 रुग्णांची प्रकरणे मंजूर झाली. त्याकरता लागणारा निधी 18 कोटी 46 लाख 53 हजार रुपयांचा मंजूर करण्यात आल्याची माहिती डॉ. शेटे यांनी बैठकीत दिली.
तालुका आभा कार्ड संख्या
जावली 63690
कराड 257336
खंडाळा 60440
खटाव 183901
महाबळेश्वर 27878
माण 126083
फलटण 107126
सातारा 251980
वाई 124003
एकूण 1523110
- आभा कार्ड नोंदणीतील अडचणी
यावेळी आभा कार्ड नोंदणीतील अडचणीही डॉ. शेटे यांनी समजून घेतल्या. त्यामध्ये आभा कार्ड नोंदणी करताना जुने फोन त्यांच्याकडे असल्याने त्यांना अडचण येत आहे. पात्र लाभार्थ्यांची नावे आयुष्यमान अॅप पोर्टलवर नोंदणी करताना नावे दिसत नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व कुटुंबातील लाभार्थी नेंदणी करताना अडचण येत आहे. काही ठिकाणी नेटवर्कची समस्या, त्यामुळे दोन वेळा ओटीपी घ्यावा लागतो. तरीही नोंदणी होत नाही. त्यामुळे अडचणी येतात. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची ई केवायसी मान्यता पेंडींग पडते. त्यास मान्यता मिळण्यासाठी 48 तासांहून अधिक काळ लागतो, अशा समस्याही त्यांनी ऐकून घेतल्या.