सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये ५१ प्रकरणे निकाली
सावंतवाडी-
सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वादपुर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ११४७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण ५१ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून रु. ३१७५२१४/- वसुल करण्यात आले .
सावंतवाडी न्यायालयाच्या सह. दिवाणी न्यायाधीश श्रीमती. आर. जी. कुंभार यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलित करून राष्ट्रीय लोक अदालतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पॅनेल समिती सदस्य ॲड. श्रीमती. पूजा साईप्रसाद नाईक - जाधव , वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. विरेश सहदेव राऊळ आदी उपस्थित होते.
सदरहू लोकअदालतीत वादपूर्व प्रकरणे ६८४ ठेवण्यात आली होती. त्यापैकी २१ प्रकरणे निकाली होवून रु ११७९२४८/- रक्कम वसूल झाली.न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ४६३ ठेवण्यात आली. त्यापैकी ३० प्रकरणे निकाली होवून रु १९९५९६६/- रक्कम वसूल झाली.
लोकअदालत यशस्वी करणेसाठी न्यायालयाचे श्रीमती.ओ. यु. शेख, सहा अधिक्षक, (प्रशासन) व श्रीमती व्ही.एम.मीर, सहा अधिक्षक, (वित्त) आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.