एकाच चेहऱ्याचे 500 लोक
चीनमध्ये असे का घडतेय
जगात एकाच चेहऱ्याचे सुमारे 7 लोक असतात असे मानले जाते. परंतु एकाच देशात एकसारखा चेहरा असलेले 500 लोक असल्याचे सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल. हा प्रकार चीनमधील आहे. येथे एकसारखे दिसणारे सुमारे 500 लोक आहेत.
चीनच्या एका बेबी-फेस्ड ब्यूटीच्या ओपिनियन लीडरने सुमारे 500 लोकांचा चेहरा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे एकसारखाच केला आहे. केओएलने लोकांना प्रेरित करत कॉस्मेटिक सर्जरीद्वारे स्वत:चा चेहरा एखाद्या मुलासारखा करविण्यासाठी तयार केले आहे.
केओएलमुळे प्रेरित होत लोकांनी मोठे डोळे सुंदर पापण्या आणि छोट्या हनुवटीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील एका महिलेने अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा केला आहे. युवा आणि निष्पाप चेहरा मिळविण्यासाठी असे करत आहोत असे कॉस्मेटिक सर्जरी करवून घेणाऱ्या महिलांचे सांगणे आहे.
या शस्त्रक्रियेदरम्यान प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्याचे एका महिलेने सांगितले. या शस्त्रक्रियेत अनेक सेशन्स होती. पहिल्या काही सेशन्समध्ये माझा चेहरा ओबडधोबड झाला, परंतु हळूहळू हे सामान्य होत गेले आणि अखेरीस मी मुलासारखा चेहरा मिळविल्याचे वांग नावाच्या महिलेने म्हटले आहे.
या प्रकरणी काही लोक या बेबी फेस सर्जरीचे समर्थन करत आहेत. तर सोशल मीडियावर अनेक लोक याचा विरोधही करत आहेत. नैसर्गिक चेहऱ्याशी छेडछाड भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते असे लोकांचे म्हणणे आहे.