महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रताळी 500-इंदोर बटाटा दरात 200 रुपयांनी वाढ

06:09 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कांदा दर स्थिर : जवारी लाल बटाट्यापेक्षा पांढऱ्या बटाट्याला मागणी वाढली : हासन बटाटा विक्रीसाठी दाखल

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

Advertisement

तेल, कडधान्याच्या पाठोपाठ भाजीपाला, कांदा दरात वाढ झाली आहे. याच्या पाठोपाठ आता इंदोर बटाट्याच्या दरात देखील हळूहळू वाढ होऊ लागली आहे. यामुळे शनिवारच्या ए.पी.एम.सी. बाजारात इंदोर बटाटा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढ झाला आहे. कर्नाटक नवीन कांदा, जुना कांदा, महाराष्ट्र कांदा, गूळ, आग्रा बटाटा यांचा भाव क्विंटलला स्थिर आहे. तालुक्यातील जवारी लाल बटाट्यापेक्षा पांढऱ्या बटाट्याला यंदा मागणी वाढली आहे. याचा भावदेखील लाल बटाट्यापेक्षा जास्त आहे. कारण अद्याप परराज्यातील बटाटा खरेदीचे खरेदीदार बेळगावात दाखल झालेच नाहीत. रताळी दर क्विंटलला 500 रुपयांनी वाढला आहे. भाजीमार्केटमध्ये टोमॅटो, शेवगा शेंगा यांच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. हासन बटाटा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये आवक वाढली आहे. हा बटाटा सध्या पाकड येत असून भाव स्थिर आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाच्या हंगामातील नवीन उत्पादनाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुरुवात होते. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातील जवारी बटाट्यासह हासन जिल्ह्यामधील बटाटा, बेळगाव रताळी, कर्नाटकातील नवीन कांद्याचे उत्पादन सप्टेंबर महिन्यामध्ये स्थानिक बाजारपेठेबरोबर बेळगाव ए.पी.एम.सी.ला देखील आवकेला प्रारंभ होतो. या मालांना खरेदीसाठी खरेदीदार देखील विविध राज्यातून बेळगाव मार्केट यार्डमध्ये दाखल होतात.

200 ट्रक कांदा मार्केट यार्डमध्ये दाखल

यंदाच्या हंगामातील कर्नाटक नवीन कांदा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला. यासह महाराष्ट्र जुना कांद्याची आवक थोड्या प्रमाणात मोजक्याच दुकानामध्ये आली होती. नवीन कांदा बेळगावहून परराज्यामध्ये निर्यात होत आहे. कारण परराज्यामध्ये कांदा नसल्यामुळे बेळगावहून कांदा मागवण्यात येत आहे. नवीन कांदा सध्या कच्चा आणि लालसर आहे. यामुळे हॉटेल, पंचतारांकित हॉटेल, कॅन्टीन मेस, खानावळीत केवळ जुन्या कांद्याची मागणी आहे. मात्र जुना महाराष्ट्र पुण्यातील कांद्याला स्थानिक बाजारातच मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे बेळगावात मागणीपुरताच जुना महाराष्ट्र कांदा येत आहे. कर्नाटकातील नवीन उत्पादनाची आवक मार्केट यार्डमध्ये दर आठवड्याला वाढतच आहे. शनिवारी सुमारे 200 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. या कांद्याला किरकोळ विक्रीसह गोवा, कोकणपट्टा आणि इतर राज्यांमध्ये निर्यात होत आहे. नवीन कांद्याचा भाव क्विंटलला 1000 पासून 4300 रुपये क्विंटल झाला. तर जुना महाराष्ट्र कांदा भाव 4500 पासून 5300 रुपये झाला.

दहा हजार पिशव्या जवारी बटाटा दाखल

बेळगाव, खानापूर तालुक्यातील जवारी बटाटा काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. सध्या लाल जमिनीतील आणि मसार जमिनीतील बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये सुमारे 10 हजार पिशव्या जवारी बटाटा विक्रीसाठी दाखल झाला होता. यामधील लाल बटाटा आणि पांढरा बटाटा समावेश होता. दरवर्षी पांढऱ्या बटाट्यापेक्षा लाल जमिनीतील बटाट्याला जास्त प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र त्याउलट झाले आहे. पांढऱ्या बटाट्यालाच मागणी जास्त असून पांढऱ्या बटाट्याची जास्त दराने विक्री सुरू आहे. कारण लाल बटाटा खरेदी करणारे परराज्यातील खरेदीदार अद्याप बेळगावात दाखल झाले नाहीत. यामुळे लाल बटाटा भाव क्विंटलला 500 पासून 2800 तर पांढरा बटाटा भाव 500 पासून 3500 रुपयांप्रमाणे विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सुमारे 8 हजार पिशव्या रताळी विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये दाखल झाली आहे. या रताळ्यांना महाराष्ट्र, पुणा, औरंगाबाद व बेळगाव जिल्ह्यामध्ये किरकोळ विक्रीसाठी मागणी आहे. याचा भाव क्विंटलला 1500 ते 3200 रुपये झाला असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.

इंदोर बटाटा भाव 200 रुपयांनी वाढ

इंदोरमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यामध्ये इंदोर नवीन बटाटा शेतवडीमधील काढणीला प्रारंभ केला जातो. सुरुवातीला इंदोर बटाटा कच्चा आणि सालपट गेलेला असतो. 2-3 महिन्यानंतर बटाटा पाकड येतो. जानेवारी महिन्यामध्ये इंदोर बटाटा, बेळगाव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दाखल होतो. यावेळी याचा भाव 1000 ते 1500 रुपये प्रती क्विंटल असतो. इंदोरमधील खरेदीदार तेजी-मंदीचे खरेदीदार व काही मोठे शेतकरी देखील बटाटा शेतवडीमध्ये जावून बटाट्याच्या राशीच खरेदी करून शितगृहामध्ये साठवून ठेवतात. आणि वर्षभर देशातील विविध बाजारात मागणीनुसार विक्रीसाठी पाठवतात. सध्या शितगृहातील बटाटा संपत आला आहे. यामुळे बाजारात इंदोर बटाटा विक्रीसाठी कमी प्रमाणात येत आहे. यामुळे बटाटा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला, अशी माहिती इंदोर बटाटा व्यापाऱ्यांनी सांगितली.

हासन बटाटा भाव स्थिर

गेल्या एक महिन्यापासून हासन जिल्ह्यातील बटाटा आवक बेळगाव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. मसार जमिनीतील बटाटा आणि काही लालसर रंगाचा बटाटा मार्केट यार्डमध्ये येत आहे. हासणहून दर शनिवारी आणि बुधवारी बाजारच्या दिवशी काही ठराविक दुकानांमध्ये हासन बटाटा विक्रीसाठी येत आहे. या बटाट्याला बेळगाव, खानापूर, गोकाक, चिकोडी, सौंदत्ती, रामदुर्ग, घटप्रभासह गोवा, कोकणपट्टा या ठिकाणी याची मागणी आहे, अशी माहिती अडत व्यापारी राजू पाटील यांनी दिली.

भाजीपाला भाव स्थिर, कोथिंबीर दरात घट

भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांच्या दरात घट निर्माण झाल्याने टोमॅटो, शेवगा व काही मोजक्याच पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. कोथिंबीर दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 15 दिवसांपूर्वी 3000 ते 5000 रुपये शेकडा कोथिंबीर असणारे भाव आता शेकड्याला 800-1300 रुपये भाव झाला आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article