For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

500 फुट आकाराचे घड्याळ

06:09 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
500 फुट आकाराचे घड्याळ
Advertisement

तुम्ही आतापर्यंत अनेक अत्याधुनिक आणि मूल्यवान  घड्याळांविषयी ऐकले असेल. हिऱ्यांनी जडविण्यात आलेले घड्याळ, तंत्रज्ञानात उत्कृष्ट असलेल्या घड्याळाबाबत तुम्ही ऐकले असेल, परंतु आता एक घड्याळ एक किंवा दोन नव्हे तर 10 हजार वर्षांपर्यंतची वेळ दर्शवू शकणार आहे. अनेकार्थाने खास हे घड्याळ सध्या इंटरेनट आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

Advertisement

अमेरिकेतील उद्योजक जेफ बेजोस यांनी सोशल मीडियावर या घड्याळाविषयी माहिती दिली आहे. हे जगातील सर्वात मोठे घड्याळ असून याचा आकार 500 फुटांचा असणार आहे. जेफ बेजोस हेच या घड्याळाचे मालक आहेत. जगातील सर्वात मोठे घड्याळ निर्माण करण्यास 42 दशलक्ष डॉलर्सचा खर्च आला आहे, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या वेस्ट टेक्सासमध्ये एका पर्वतात हे घड्याळ तयार केले जात आहे. हे घड्याळ वर्षात केवळ एकदाच टिक करणार आहे, परंतु यामुळे पुढील 10 वर्षांच्या कालावधीची माहिती मिळविणार आहे. घड्याळाचे अंतिम डिझाइन पूर्ण झाले आहे.

500 फूट लांब, पूर्णपणे यांत्रिक दिवस/रात्र थर्मल चक्राद्वारे संचालित आणि दीर्घकालीन विचाराचे प्रतीक तयार करत आहोत. टीम यावर मोठी मेहनत घेत आहे. आम्ही काही मोठे प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत असे जेफ बेजोस यांनी 2018 मध्ये नमूद केले होते.

Advertisement

डॅनी हिलिस यांच्या स्वप्नाची पूर्ती

अशाप्रकारच्या घड्याळाची कल्पना सर्वप्रथम 1995 मध्ये कॉम्प्युटर वैज्ञानिक आणि आविष्कारक डॅनी हिलिस हिलिस यांनी मांडली होती. शतकाचा काटा प्रत्येक 100 वषोंमध्ये एकदा पुढे जात असेल, तसेच ज्या घड्याळामुळे पुढील 10 हजार वर्षापर्यंतची वेळ समजू शकेल अशाप्रकारच्या घड्याळाचा प्रस्ताव हिलिस यांनी मांडला होता.  दीर्घकालीन विचाराचा सर्वात मोठा पुरावा

जेफ हे डॅनी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे घड्याळ विजेद्वारे नव्हे तर पृथ्वीच्या थर्मल सायकलद्वारे संचालित होणार आहे. यात एक झंकार जनरेटर देखील असून जो 3.5 दशलक्षापेक्षा अधिक यूनिक बेल चाइम सीक्वेंस तयार करणार आहे. हे घड्याळ म्हणजे दीर्घकालीन विचाराचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.