महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शबरीमलामध्ये प्रतिदिन 50 हजार भाविकांना दर्शनाची अनुमती

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मिळणार खास सुविधा : त्रावणकोर देवस्थानम मंडळाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम

Advertisement

त्रावणकोर देवस्थानम मंडळाने अयप्पाभक्तांना मोठी खूशखबर दिली आहे. व्हर्च्युअल क्यू बुकिंग सिस्टीमच्या माध्यमातून प्रतिदिन 50 हजार भक्तांना अयप्पा स्वामी यांचे दर्शन करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर भाविकांसाठी विमा सुविधाही लागू करण्यात येणार आहे. पूर्वी प्रतिदिन 80 हजार लोकांना दर्शनाची अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काही निर्बंधांमुळे हा आकडा कमी करत 50 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील मंडल आणि मकरविलक्कू हंगामापासून लागू करण्यात येणार आहे. दुसरीकडे दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा पूर्वी केवळ 10 दिवसांपर्यंतच उपलब्ध होती. सध्या व्हर्च्युअल क्यू बूकिंग तीन महिन्यांपूर्वी प्रदान केली जाते. तसेच याद्वारे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा विमा काढला जाणार आहे. याकरता त्यांच्याकडून बुकिंगच्या वेळी 10 रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. देवस्थानम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यात्रेदरम्यान अनपेक्षित स्थिती उद्भवल्यास सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. विम्याची कक्षा वाढविण्यासाठी विमा कंपन्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सेंसरद्वारे होणार भाविकांची गणना

दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि मुलांना विशेषस्वरुपात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सच्या माध्यमातून दर्शनासाठी पाठविले जाणार आहे. तसेच महिला आणि दिव्यांग लोकांसाठी अप्पम आणि अरावना प्रसाद वितरण केंद्रांवर विशेष दालन स्थापन करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोजण्यासाठी अरावना प्रकल्पात एक काउंटिंग सेंसर बसविण्यात येणार आहे. दुसरीकडे अन्नदान मंडपममध्ये कूपनऐवजी पीओएस मशीनच्या माध्यमातून टोकन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article