For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : जावलीत पावसामुळे भात उत्पादनात 50% घट; शेतकरी वर्ग हवालदिल

04:23 PM Nov 27, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   जावलीत पावसामुळे भात उत्पादनात 50  घट  शेतकरी वर्ग हवालदिल
Advertisement

Advertisement

केळघर-केर्हथे-मेढा भागातील पिकांवर अतिवृष्टीचा फटका

केळघर : सध्या जावलीत भात काढणी अंतिम टप्यात असून मे महिन्यापासून संततधार पावसाने केळघर-केहये-मेढ़ा परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून जादा घटल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

Advertisement

पावसाचे आगर म्हणून ओळख असणाऱ्या जावली तालुक्यात संततधार पाऊस पडूनही प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे कागदोपत्री अतिवृष्टीची नोंदच नसल्याने तालुका अतिवृष्टीग्रस्त निकषात बसला नाठी व शेतकरी वर्गाचे भरून न येणारे नुकसान झाले.

जावली तालुक्यातील केळघर, केर्हथे, मेढा व वेण्णा दक्षिण विभागात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते. परंतू गेली ६-७ महिने संतत धार, कधी मुसळधार पाऊस पडल्याने भात पिकांवर विपरित परिणाम होऊन रोग पडला त्यामुळे उत्पन्नात घट झाली. २०-२५ मण भात पिकणाऱ्या शेतात ५-६ मण पदरात पडले असून रेंगडी, खिलार मुरा, भोगवली मुरा, म्हाते मुरा, एवढा पाऊस पडूनही अतिवृष्टीतून तालुका वगळला

जावली तालुक्यातील पर्जन्यमान मोजण्यासाठी किती गावात पर्जन्यमान मापक यंत्र आहेत ? असतील तर त्याची गाववार नोंद आहे का? हा एक चिंतनाचा विषय असून एवढा पाऊस पडूनही संपुर्ण जावली तालुकाच अतिवृष्टीतून वगळला. लोक प्रतिनिधीच्या आदेशाला केराची टोपली वाखवत कुठेही पिक नुकसानीचे पंचनामेडी केले नाहीत. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाटणे माची, कुसुंबी मुरा, आदी मात पिक अती पाऊस व धुक्यामुळे पोसलेच नसल्याने केवळ भाताचे खुंट पहाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एक तर उत्पन्न कमी त्यात कामगारांची वाढलेली मजूरी याचा ताळमेळ कसा बसवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकरी घरच्या घरी भात काढणी, झोडणी करत आहे ते भात पदरात पाहून घेत आहेत तर काही शेतकरी हार्वेस्टींग मशीनद्वारे भात कापणी, झोडणीमुळे मजुरांचा खर्च वाचत असला तरी भाताच्या पेंढ्याचा चुरा होऊन शेतात विखुरला जात असल्याने तो सुकून पेटवल्याशिवाय लवकर गहू पेरणी करता येणार नाही.

Advertisement
Tags :

.