रविवारी दिवसभरात 50 विमानांना धमकी
गेल्या 14 दिवसात 350 हून अधिक धमक्मया
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या पंधरवड्यापासून विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्यासंबंधी मिळत असलेल्या धमकींचे सत्र अद्याप संपताना दिसत नाही. रविवारी दिवसभरात इंडियन एअरलाईन्सच्या आणखी 50 विमानो•ाणांना बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाली. या विमानांमध्ये इंडिगोच्या 18, विस्ताराच्या 17 आणि अकासा एअरलाईन्सच्या 15 विमानांचा समावेश आहे. तसेच गेल्या 14 दिवसांत एकूण 350 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत. तपासात या सर्व धमक्मया खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग, विमानांची तपासणी आणि प्रवाशांच्या तात्पुरत्या सेवेवर विमान कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. गेल्या काही दिवसात विमान कंपन्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक धमक्मया देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी अयोध्या विमानतळावरही विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली. अकासा एअरने रविवारी आपल्या 15 फ्लाइट्सना सुरक्षा अलर्ट प्राप्त झाला आणि सर्व विमानांना कसून तपासणी केल्यानंतर ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. याचदरम्यान इंडिगोच्या 18 फ्लाइट्स आणि विस्ताराला 17 फ्लाइट्सनाही विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली होती. विमान कंपन्यांना वारंवार बॉम्बच्या धमक्मयांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना बंधने पाळण्यास सांगितले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय विमान कंपन्यांकडून मिळालेल्या खोट्या बॉम्बच्या धमक्मयांना तोंड देण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.