महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपह्त 50 टक्के मुली अद्यापी बेपत्ता

05:19 PM Jan 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या जिह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलींचे अपहरण होत आहे. हा गंभीर प्रकार शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील गुह्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आला. तसेच अपहरण झालेल्या मुलीपैकी पन्नास टक्के मुली अद्यापही बेपत्ता आहेत. मुली बेपत्ता होण्याच्या कारणांवर पोलिसांनी काम करावे, अशा सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अदिकाऱ्यांना दिले.

Advertisement

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यातर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत मागील वर्षामध्ये महिला अत्याचाराच्या घटनाबाबत दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात केलेल्या कार्यवाही, या गुह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाय योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत, जेष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्यांचा या बैठकीत प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी संशयितांचा तातडीने शोध घेवून, त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुह्यांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच गुह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या सभागृहात झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या समवेत व परिक्षेत्राच्या हद्दीतील जिह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या समवेत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक हे उपस्थित होते. तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अक्षीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ऑनलाईन उपस्थित होते.

                                    पोलीस ठाण्यात गुह्याबाबतची माहिती फलकांवर लावा

पोलिसांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुह्यांचा शोध लावण्याबरोबर घडलेल्या गुह्यांच्या मुळ कारणांपर्यत जाण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देवून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, पॉक्सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुह्याचा तपास करताना, पिढीतेची ओळख गुप्त राहील. पिडीत व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करावे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुह्यांसंदर्भातील अद्ययावत माहिती फलकांवर लावण्यात यावी, अशा सुचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article