50 हजार वर्षे जुन्या हाडांमध्ये सापडले सद्यकालीन विषाणू
वैज्ञानिकांनी अलिकडेच दोन प्राचीन हाडांची तपासणी केली. ही हाडं निएंडरथल मानवांची होती. या हाडांमध्ये आधुनिक माणसांमध्ये आढळून येणारे 3 विषाणू सापडले आहेत. तर ही हाडं सुमारे 50 हजार वर्षे जुनी आहेत. यामुळे हे विषाणू अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निएंडरथलच्या हाडांमधून सुमारे 20 हजार वर्षे जुने म्हणजेच वैज्ञानिकांना आतापर्यंतचे सर्वात जुने मानवी विषाणू सापडले आहेत. यापूर्वी सायबेरियात एका मुलाचा दात सापडला होता, ज्यात 31 हजार वर्षे जुना विषाणू आढळून आला होता. ज्या हाडांची तपासणी करण्यात आली, ती रशियाच्या अल्ताई माउंटेन्सनजीक चाग्यरस्काया गुहेत सापडली होती.
विषाणू एका डीएनएतून दुसऱ्या डीएनएत शिफ्ट होत गेले, सिक्वािंसिंग करत गेल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले. यातील काही विषाणू हे आधुनिक माणसांनाही आजारी करतात. या विषाणूंमुळे जीवनभराची समस्या देखील असू शकते. परंतु सद्यकालीन नसलेले विषाणू होमो सॅपियन्सच्या प्रारंभीच्या काळातील असल्याचे सांगण्यात आले.
अध्ययनातूत होमो सॅपियन्सचे पूर्वज म्हणजेच निएंडरथल मानव तीन प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित झाल्याचे समोर आले, एडिनोव्हायरस, हर्पिस व्हायरस आणि पॅपिलोमावायरस हे तीन प्रकार होते, हे तिन्ही विषाणू आजच्या माणसांनाही संक्रमित करतात. आजच्या काळात एडिनोव्हायरस अनेक प्रकारचे आजार निर्माण करतात, यात सर्दी, डोळे लाल होणे, गळ्यात इन्फेक्शन होत असते. पॅपिलोमाव्हायरसमुळे लैंगिक आजार फैलावतात. तसेच काही प्रकारचे कर्करोग होतात. हर्पिसवायरसमुळे कोल्ड सोरेस, चिकनपॉक्स किंवा मोनो हे यासारखे आजार होतात.
निएंडरथल मानवांमध्ये मिळालेला हर्पिसव्हायरस पाहता त्यांना कोल्ड सोरेस झाल्याचे मानले जातेय. या विषाणूंमुळेच निएंडरथल मानवांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. कारण त्या काळात कुठलेच उपचार नव्हते. निएंडरथल मानव सुमारे 40 हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आले होते. संबंधित अध्ययन बायोरक्सिव्हमध्ये प्रकाशित झाले आहे.