For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेत 50 बळी

06:56 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेत 50 बळी
Advertisement

मालमत्ता-घरे जमीनदोस्त : 2.51 लाख कोटी ऊपयांचे नुकसान

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत धडकलेल्या हेलन चक्रीवादळामुळे आतापर्यंत 5 राज्यांमध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे आलेल्या पुरात अनेक घरे वाहून गेली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव दक्षिण पॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये दिसून आला. अमेरिकेतील वादळामुळे 45 लाख लोकांच्या घरात वीजपुरवठा गायब झाला आहे. फ्लोरिडामध्ये बचाव कार्यासाठी 4 हजार नॅशनल गार्ड्समन तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement

दक्षिण पॅरोलिना आणि जॉर्जिया या दोन विभागांमध्ये वादळामुळे 34 लोकांचा मृत्यू झाला. तसेच चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये वादळामुळे अनेक लोक अडकले आहे. विविध भागात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर पॅरोलिनामध्ये काही ठिकाणी भूस्खलनही झाले. लोकांना वाचवण्यासाठी येथे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. या काळात ऊग्णालयाच्या छतावरून 59 जणांची सुटका करण्यात आली.

हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेचे 2 लाख 51 हजार कोटी ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज फायनान्शियल कंपनी मूडीजने व्यक्त केला आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोच्या खाडीतून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर आदळणारे हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. हे अमेरिकेच्या इतिहासातील 14 सर्वात धोकादायक चक्रीवादळांपैकी एक आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 1 कोटी 20 लाख लोकांना वादळाचा फटका बसला आहे. तसेच 1 हजार उ•ाणे रद्द करण्यात आली. येत्या दोन ते तीन दिवसांत 5 कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.