अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवर काळाची झडप
08:49 AM May 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
इर्टिगा कार जगबुडी नदीपात्रात कोसळली,पाच जणांचा अंत
Advertisement
खेड / प्रतिनिधी
देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा अंत झाला. चालकासह अन्य एक सुदैवाने बचावला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर ( सर्व रा. मिरा रोड -मुंबई ) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा होऊन प्रवासी आतमध्येच अडकले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
Advertisement
Advertisement