महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन महिन्यांत रेल्वेत 5 जणांवर हल्ला

11:03 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वे सेवेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर : सुरक्षा अॅपदेखील बंद

Advertisement

बेळगाव : धावत्या रेल्वेमध्ये खानापूरनजीक एका माथेफिरूने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. यामुळे रेल्वेस्थानक तसेच रेल्वेचा प्रवास किती सुरक्षित आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मागील दोन महिन्यांत रेल्वे विभागामध्ये तब्बल पाच जणांचा खून झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे आतातरी रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. पुदुच्चेरी-दादर चालुक्य एक्स्प्रेसमध्ये खानापूरनजीक एका हल्लेखोराने रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर चाकूहल्ला केला. यामध्ये एका निष्पाप कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. हुबळी येथे अंजली नामक युवतीवर हल्ला करणारा हल्लेखोर गिरीश सावंत याने मायकोंडा स्टेशन येथे एका महिलेवर चाकूने वार केल्याची घटना ताजी आहे. माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील दोन महिन्यांत रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वेत पाच जणांचे खून झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने देशात सर्वप्रथम ‘एसडब्ल्यूआर सुरक्षा अॅप’ जून 2016 मध्ये लाँच केले. परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हे अॅप कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे. एक्स्प्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचीही व्यवस्था करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु बऱ्याचवेळा तिकीट तपासणीकांसोबत झालेल्या वादावादीनंतर हल्ला झाल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. विशेषत: महिला प्रवाशांना ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा फटका बसतो. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातही बरीच पुरुष मंडळी बसलेली असतात. त्यावेळी कोणाकडे तक्रार करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कनमाडी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रेल्वे पोलीस दल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. त्यांच्याकडून प्रत्येक रेल्वेस्थानक तसेच धावत्या रेल्वेमध्ये वेळोवेळी तपासण्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांनी निर्धोक प्रवास करावा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article