‘सागरमाला’चे गोव्यातील 9 पैकी 5 प्रकल्प पूर्ण
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची माहिती
पणजी : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत गोव्यात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यावर आतापर्यंत 85 कोटी ऊपये खर्च करण्यात आले आहेत. गोव्यात सागरमाला योजनेंतर्गत 9 प्रकल्प प्रस्तावित असून त्यावर 763 कोटी ऊपये खर्च होणार आहेत. त्यापैकी सध्या 85 कोटी ऊपयांचे 5 प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर 4 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. त्यावर 677 कोटी ऊपये खर्च होणार आहेत, अशी माहिती बंदर आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. सागरमाला योजनेंतर्गत केंद्राकडून राज्य सरकारना बंदर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा, किनाऱ्यांवर बर्थ प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे प्रकल्प, मत्स्य बंदर, कौशल्य विकास प्रकल्प, किनारी समुदाय विकास, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल आणि रो-पॅक्स फेरी सेवा, यासारख्या अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात येते.