For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीवरील 5 रहस्यमय ठिकाणं

06:39 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीवरील 5 रहस्यमय ठिकाणं
Advertisement

वैज्ञानिकांनाही करता आली नाही रहस्याची उकल

Advertisement

जगात अनेक रहस्यं असून यातील अनेक रहस्यांची उकल करण्यात आली आहे. तर काही रहस्यांची उकल करणे वैज्ञानिकांना आतापर्यंत शक्य झालेले नाही. काही ठिकाणांना एलियन्समुळे तर काही ठिकाणांना भूतांमुळे रहस्यमय मानले जाते.  जगात अनेक अशी ठिकाणं आहेत जी अत्यंत सुंदर आहेत, परंतु रहस्यमय देखील आहेत. या रहस्यांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक कित्येक वर्षांपासून संशोधन करत आहेत.

ग्रीन माउंटेन नॅशनल फॉरेस्ट

Advertisement

हे अमेरिकेच्या साउथ वेस्टर्न वेरमॉन्टमध्ये असून याला अत्यंत रहस्यमय मानले जाते. 1945 मध्ये या ठिकाणी एक इसम गाइड म्हणून काम करायचा, त्याचे नाव मेंडी रिवर्स होते, तो 12 नोव्हेंबर 1945 रोजी परतताना बेपत्ता झाला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळू शकले नाही. यानंतर 1949 मध्ये येथून तीन शिकारी बेपत्ता झाले, मग 1949 मध्ये जेम्स ई जेफोर्ड नावाचा इसमही बेपत्ता झाला, यापैकी कुणाचाच मृतदेह मिळू शकलेला नाही तसेच त्यांचा थांगपत्ताही लागला नाही

रोसवेल

हे ठिकाण देखील अमेरिकेत असून न्यू मेक्सिकोत स्थित रोसवेल एलियन कॉन्सपिरेसी थ्योरीजचे हब आहे. 1947 मध्ये हे ठिकाण अचानक चर्चेत आहे. येथे काम करणाऱ्या लोकांनी अधिकाऱ्यांना एक उडती तबकडी दुर्घटनाग्रस्त झाल्याचे त्याचे अवशेष शेतात पडल्याचे कळविले होते. हे ठिकाण अद्याप लोकांसाठी रहस्य आहे.

स्टोनहेंज, इंग्लंड

इंग्लंडमध्ये असलेले स्टोनहेंज रहस्यांनी भरलेले ठिकाण आहे. हे स्थान सुमारे 5 हजार वर्षे जुने आहे. हे युनिक ब्ल्यूस्टोन सामग्रीने निर्मित विशाल मेगालिथ दगडांचे एक गोलाकार समूह आहे. स्टोनहेंज इंग्लंडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ देखील आहे. स्टोनहेंजच्या या खडकांमागे एक रहस्य लपलेले असून यावरुन लोक अनेक प्रकारचे दावे करतात. परंतु या रहस्याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. स्टोनहेंजचे विशाल खडक सुमारे 23 फुटांपर्यंत उंच आहेत. या खडकांना उंच उभे करण्यात आल्यावर एक वर्तुळाकार देण्यात आला आहे. सुमारे ख्रिस्तपूर्व 3000 ते 2000 सालादरम्यान याची निर्मिती करण्यात आली असावी असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. त्या काळात कुठल्याही प्रकारची यंत्रसामग्री नव्हती, मग अशा विशाल खडकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे नेण्यात आले आणि त्यांना हा आकार कसा देण्यात आला हा प्रश्न उपस्थित होतो.

कोडिन्ही, भारत

जगाप्रमाणेच भारतातही अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. यात केरळमधील एक छोटेसे गाव कोडिन्ही देखील सामील आहे. या गावात सुमारे शेकडो परिवार राहतात. जगातील हे एकमात्र असे गाव आहे, जेथे केवळ जुळी मुलं जन्माला येतात. या गावात सुमारे 200 जुळी मुलं असून यामागील रहस्य काय याचा शोध कुठलाही डॉक्टर किंवा वैज्ञानिक आजवर लावू शकलेला नाही.

एंगिकुनी सरोवर

कॅनडातील या सरोवराला अत्यंत रहस्यमय मानले जाते. याच्या काठावर एक गाव वसलेले होते, जे एक रहस्य होते. 1930 मध्ये अचानक या गावातील लोक गायब झाले, या गावात लाबेल नावाचा इसम पोहोचला, त्याला घरातील चुलींवर अन्न दिसून आले, प्रत्येक घरातील कामं अर्धवट पडली होती. लोक कुठे तरी गेले असतील आणि परत येतील असे लाबेलला वाटले होते. परंतु या गावात राहणाऱ्या 2 हजार लोकांपैकी कुणाचाच आजवर शोध लागलेला नाही.

Advertisement
Tags :

.