महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चौथ्या दिवशी भारताला आणखी 5 सुवर्ण पदके

06:38 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी : दिवांशी, मुकेश नेलावल्ली यांनी मिळविले यश

Advertisement

वृत्तसंस्था/ लिमा, पेरू

Advertisement

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने आणखी पाच सुवर्णपदकांची भर घातली. भारताची एकूण पदकसंख्या आता 14 झाली असून त्यात 10 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. अमेरिका (10) व इटली (8) दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

दिवांशी व मुकेश नेलावल्ली यांनी महिला व पुरुषांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. अंतिम फेरीत दिवांशीने 35 गुण नोंदवत इटलीच्या क्रिस्टिना मॅगनानीला केवळ 2 गुणांनी हरवित पहिले स्थान मिळविले. फ्रान्सच्या हेलोइस फोअरने कांस्यपदक मिळविले. दिवांशीने तेजस्विनी व विभूती भाटिया यांच्यासमवेत महिलांच्या 25 मी. पिस्तूल सांघिक नेमबाजीत 1711 गुण घेत पहिले स्थान मिळविले तर झेचिया व जर्मनी यांना दुसरे व तिसरे स्थान मिळाले.

दिवांशीला सुवर्ण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तिचे पहिल्या 15 पैकी 7 टार्गेट हुकल्याने ती सहाव्या स्थानावर फेकली गेली. मात्र नंतर तिने स्वत:ला सावरले आणि पुढच्या 20 पैकी 16 टार्गेटमध्ये अचूक वेध घेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली. दहा सिरीजच्या फायनलमध्ये आणखी तीन सिरीज बाकी होत्या. नऊ सिरीजमध्ये 31 टार्गेट्स झाल्यानंतर दिवांशी व इटलीची मॅगनानी यांचे समान गुण झाले होते. दिवांशीने 4 मध्ये अचूक वेध घेतला तर मॅगनानी तीनदा चुकली. दिवांशीने पात्रता फेरीत 577 गुण घेत पाचवे स्थान मिळविले होते तर तेजस्विनीने 569, विभूतीने 565 गुण घेत 13 वे व 22 वे स्थान मिळविले.

नेलावल्लीनेही आणखी दोन सुवर्ण मिळविली. त्याने आतापर्यंत 3 पदके मिळविली आहेत. त्याने 25 मी. पिस्तूल नेमबाजीत 585 गुणांसह सुवर्ण, सूरज शर्माने रौप्य मिळविले. नेलावल्ली, शर्मा व प्रद्युम्न सिंग (561) यांनी 1729 गुणांसह सांघिक सुवर्ण, 1726 गुणांसह पोलंडने रौप्य व इटलीने कांस्यपदक मिळविले.

भारताचे दिवसातील पाचवे सुवर्ण कनिष्ठ पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पी सांघिक प्रकारात मिळविले. शौर्या सैनी, वेदांत नितिन वाघमारे, परिक्षित सिंग ब्रार यांनी 1753 गुण घेत पहिले स्थान मिळवित ज्युनियवर वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. नॉर्वेने 1748 गुणांसह रौप्य व स्वीडनने 1746 गुणांसह कांस्यपदक मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article