For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगावात दोन कारवर झाड कोसळून 5 लाखांचे नुकसान

12:51 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगावात दोन कारवर झाड कोसळून 5 लाखांचे नुकसान
Advertisement

मडगाव : आकें-मडगाव येथे दोन कारवर आंब्याचे झाड कोसळण्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यात सुमारे 5 लाखांचे नुकसान  झाल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाने दिली आहे. आंब्याच्या झाडा नजीक पार्क करण्यात आलेल्या दोन कारवर हे झाड पडले. यात आय 20 व सिफ्ट डिझायर अशा दोन कारच्या टपासह काचांचेही नुकसान झालेले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तासाभराच्या परिश्र्रमानंतर कारवर पडलेले झाड तोडून बाजूला केले. याशिवाय ऊमडामळ येथील पूजा मोटर्सनजीकच्या घराच्या छपरावर एक मांजर अडकून पडलेले होते. अग्निशामक दलाकडून त्या मांजराला सुखऊप खाली उतरवण्यात यश आले.ऊमडामळ अंजूमन शाळेनजीक रस्त्यावर पडलेल्या चिक च्या रक्तावर पाण्याचा मारा करत अग्निशामक दलाकडून रस्ता वाहतुकीला सुरक्षित करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.